त्वरा करा ! Nothing Phone 1 फक्त रु. 15,499मध्ये खरेदी करण्याची संधी, मिळतेय भारी सवलत

Updated on 07-Nov-2022
HIGHLIGHTS

Nothing Phone 1 प्रचंड सवलतीसह खरेदी करा.

हा फोन फ्लिपकार्टवरून केवळ 15,499 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डने फोन खरेदी केल्यास 5 % कॅशबॅक उपलब्ध आहे.

नथिंग फोन 1 यावर्षी 12 जुलै रोजी लाँच करण्यात आला आहे. फोनची सुरुवातीची किंमत 32,999 रुपये आहे. मात्र, आता फोनच्या किमतीत वाढ करण्यात आली असून लॉन्च झाल्यापासून महिनाभरातच नथिंग फोन 1 ची किंमत एक हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आता फोनची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये आहे, परंतु नथिंग फोन 1 वर ई-कॉमर्स साइटवर मोठी सूट मिळतेय. डिस्काउंटसह, फोन फक्त 15,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. बघुयात ऑफर… 

हे सुद्धा वाचा : WhatsAppने जारी केले अप्रतिम फीचर! तुम्हाला मिळेल अधिक प्रायव्हसी, 'अशा'प्रकारे लपवा ऑनलाइन स्टेटस…

Nothing Phone 1 ची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये आहे. या किंमतीत तुम्हाला 8 GB रॅमसह 128 GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. हा फोन फ्लिपकार्टवर 13 % सवलतीसह 32,999 रुपयांच्या किमतीत सूचीबद्ध आहे. तर, फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डने फोन खरेदी केल्यास 5 % कॅशबॅक उपलब्ध आहे.

एवढेच नाही तर फोनसोबत एक्सचेंज ऑफर अंतर्गत 17,500 रुपयांपर्यंतची बचतही करता येते. म्हणजेच हा फोन सर्व प्रकारच्या ऑफरसह एकूण 15,499 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

Nothing Phone 1 चे स्पेसिफिकेशन्स

Android 12 नथिंग फोन 1 सह उपलब्ध आहे. तर, फोनमध्ये 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.55-इंच लांबीचा फुल HD + OLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेसह HDR10+ साठी समर्थन आहे आणि ब्राइटनेस 1200 nits आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसर असून 12 GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.

त्याबरोबरच, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरे आहेत. एक लेन्स 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX766 सेन्सर आहे आणि तो OIS आणि EIS दोन्हीला सपोर्ट करतो. दुसरा लेन्स 50-मेगापिक्सेलचा सॅमसंग JN1 सेन्सर देखील आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल आहे. फ्रंटला 16-मेगापिक्सलचा Sony IMX471 कॅमेरा देण्यात आला आहे. दरम्यान, फोनमध्ये 4500mAh बॅटरी 33W वायर चार्जिंगसह मिळेल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :