बजेट किमतीत खरेदी करता येईल Nothing Phone 1, ‘अशा’प्रकारे करा ऑर्डर

बजेट किमतीत खरेदी करता येईल Nothing Phone 1, ‘अशा’प्रकारे करा ऑर्डर
HIGHLIGHTS

Nothing Phone 1 कमी किमतीत खरेदी करा.

फोन त्याच्या ट्रान्सपरंट बॅक पॅनलमुळे बराच काळ चर्चेत होता.

फ्लिपकार्टवर Nothing Phone 1 वर मोठी सवलत

फ्लिपकार्टवर Nothing Phone 1 वर मोठी सवलत दिली जात आहे. हा फोन गेल्या वर्षी लाँच झाला होता. फोन त्याच्या ट्रान्सपरंट बॅक पॅनलमुळे बराच काळ चर्चेत होता. हा फोन या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग फोन आहे. या फोनवर सध्या उत्तम डिस्काउंट दिले जात आहे. 

Nothing Phone 1 किंमत आणि ऑफर्स 

Nothing Phone 1 चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 29,999 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. यावर एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला तब्बल 27,000 रुपयांची सूट उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, हा फोन तुम्ही EMI वर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,026 रुपये मोजावे लागतील. 

याव्यतिरिक्त, या फोनवर Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवरून व्यवहार केल्यास तुम्हाला 5% सूट देखील मिळेल. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्टला भेट द्या. 

Nothing Phone 1 चे फीचर्स आणि स्पेक्स 

Nothing Phone 1 मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.55-इंच लांबीचा फुल HD प्लस OLED डिस्प्ले आहे. HDR10+ डिस्प्लेसह समर्थित आहे आणि ब्राइटनेस 1200 nits आहे. फोनमध्ये Snapdragon 778 G+ प्रोसेसर असून 12 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये Android 12 उपलब्ध आहे. तर, फोनमध्ये 4500mAh बॅटरी उपलब्ध आहे, ज्यामध्ये 33W वायर चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसह 5W रिव्हर्स चार्जिंगसाठी देखील समर्थन आहे.

 Nothing Phone 1 मध्ये दोन रियर कॅमेरे आहेत, ज्यात एक लेन्स 50 मेगापिक्सेल Sony IMX 766 सेन्सर आहे आणि यासोबत OIS आणि EIS दोन्ही सपोर्ट आहेत. दुसरा लेन्स 50-मेगापिक्सेलचा सॅमसंग जेएन1 सेन्सर देखील आहे जो अल्ट्रा वाइड अँगल आहे. समोर 16-मेगापिक्सलचा Sony IMX471 कॅमेरा देण्यात आला आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo