प्रतीक्षा संपली ! Nothing phone 1 ची ग्लोबल लॉन्चिंग आज, ‘अशा’प्रकारे बघा लाइव इवेंट

प्रतीक्षा संपली ! Nothing phone 1 ची ग्लोबल लॉन्चिंग आज, ‘अशा’प्रकारे बघा लाइव इवेंट
HIGHLIGHTS

Nothing phone 1 ची ग्लोबल लॉन्चिंग आज

नथिंग फोन 1 चा लाँच इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता

लॉन्च इव्हेंट कंपनीच्या वेबसाइट, यु ट्यूब चॅनेल, सोशल मीडिया हँडलवर पाहता येईल.

नवीन टेक कंपनी नथिंग आपला पहिला स्मार्टफोन Nothing phone 1 आज म्हणजेच 12 जुलै रोजी जागतिक स्तरावर लाँच करणार आहे. OnePlus चे सह-संस्थापक कार्ल पेई यांनी ही कंपनी सुरू केली. त्याबरोबरच, कंपनीचे पहिले प्रोडक्ट Nothing buds  गेल्या वर्षी लाँच झाले. नथिंग फोन 1 चा लाँच इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता असेल. कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलशिवाय, नथिंग फोन 1 चा लॉन्च इव्हेंट कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवर देखील पाहता येईल. लॉन्च इव्हेंट कंपनीच्या वेबसाइटवर देखील प्रसारित केला जाईल.

हे सुद्धा वाचा : जबरदस्त ! Portronics चे नवीन वायरलेस हेडफोन्स लाँच, तासाभराच्या चार्जिंगवर तब्बल 30 तास चालेल बॅटरी

Nothing Phone 1 ची अपेक्षित किंमत

Nothing Phone 1 बद्दल सांगितले जात आहे की, या फोनची किंमत 30,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान असेल. Amazon India वरून फोनची विक्री होईल. हे Amazon वर देखील सूचीबद्ध केले गेले आहे. फोनचा 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon जर्मनी वेबसाइटवर 469.99 युरोच्या किंमतीत सूचीबद्ध केला गेला आहे, ज्याची किंमत सुमारे 37,900 रुपये आहे.

nothing phone 1

नथिंग फोन 1 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

 नथिंग फोन 1 बद्दल कन्फर्म झाले आहे की, यात स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसर मिळेल. याशिवाय फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा उपलब्ध असेल, ज्यामध्ये प्राइमरी लेन्स 50 मेगापिक्सेल असेल. Nothing च्या या फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.55-इंच लांबीचा OLED डिस्प्ले मिळेल. फोनच्या पुढील आणि मागील पॅनलवर गोरिल्ला ग्लास उपलब्ध असेल. याशिवाय, यात अँड्रॉइड 12 मिळेल. 

नथिंगच्या या फोनमध्ये LED  नोटिफिकेशन लाईट देण्यात आली आहे, ज्यामुळे त्याची डिझाईन अधिक आकर्षक  बनते. फोन कॉल आल्यावर आणि सूचना आल्यावरही हे लाईट्स ग्लो होतील. फोनच्या मागील पॅनलवर बॅटरी लेव्हल देखील दिसेल. फोनसह बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध होणार नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo