Nothingने त्याच्या पहिल्या Nothing Phone 1 स्मार्टफोनची डिझाईन अधिकृतपणे उघड केलेली नाही. कंपनी बर्याच दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लाँचला टीज करत होती आणि आता त्याचा फर्स्ट लुक देखील समोर आला आहे. कंपनीच्या सोशल मीडिया चॅनेलवर अधिकृत पोस्टर समोर आले आहे, ज्यामध्ये आपण मागील बाजूस एक ड्युअल-कॅमेरा सिस्टम पाहू शकतो. मागील लीक्सने दावा केला होता की, फोन नथिंग इअर (1) प्रमाणेच ट्रान्सपरंट डिझाइनसह येईल.
रियर कॅमेऱ्यांच्या पुढे, आपण फ्लॅश आणि एक मोठे वर्तुळ पाहू शकतो. इतर फीचर्स अजूनही अस्पष्ट आहेत आणि कंपनीने अद्याप फ्रंट पॅनेलचा खुलासा केला नाही. नथिंग फोन 1 ला व्हाईट व्यतिरिक्त इतर कलर ऑप्शन्स मिळतील की नाही, हे देखील स्पष्ट नाही. याक्षणी, नथिंग इअर 1 ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो.
https://twitter.com/nothing/status/1536936722575118337?ref_src=twsrc%5Etfw
हे सुद्धा वाचा : रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, जबरदस्त VFX, काही तासांतच मिळाले लाखो व्युज
नथिंग फोन 1 फोन 12 जुलै रोजी रात्री 8:30 IST ला लाँच होईल, अशी माहिती मिळाली आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन देखील पाहिला जाऊ शकतो. डिव्हाइसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट असेल, याबाबत कंपनीने पुष्टी केली आहे. इतर लीक दावा करतात की नथिंग फोन (1) ची किंमत EUR 500 असेल, जी अंदाजे 41,500 रुपये आहे.
हा फोन 90Hz रिफ्रेश रेटसह 6.55-इंच लांबीच्या फुल-HD+ OLED पॅनेलसह येईल असेही म्हटले जाते. मागील कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे, आणि समोरच्या पॅनेलमध्ये 32-मेगापिक्सेलचा स्नॅपर मिळू शकतो. हा स्मार्टफोन कंपनीच्या तामिळनाडू प्लांटमध्ये तयार केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.