लक्ष द्या ! फ्लिपकार्ट सेल सुरु होताच Nothing Phone 1 वर मिळतायेत अप्रतिम ऑफर्स

Updated on 04-May-2023
HIGHLIGHTS

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल सुरु

SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 10% झटपट सवलत

नथिंग फोन (2) लाँच होण्याआधी हा फोन विशेष किमतीत खरेदी करा.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल आज दुपारी 12 वाजतापासून सुरू झाला आहे.  सेल दरम्यान Nothing Phone (1) च्या किंमतीत मोठी कपात होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नथिंग फोन (1) हा या विभागातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन आहे. नथिंग फोन (2) लाँच होण्याआधी फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये हे उपकरण विशेष किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

किंमत आणि ऑफर्स :

नथिंग फोन (1) सध्या 29,499 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. याशिवाय, जर ग्राहकांना बँक ऑफरचा लाभ घेता येईल. तर फोन आणखी स्वस्तात मिळू शकतो. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 10% झटपट सवलत आहे. तर, SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवरही 10% झटपट सूट देण्यात येत आहे. ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी फ्लिपकार्ट साईटला भेट द्या. 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नथिंग फोन (1) मध्ये 6.55-इंच लांबीचा OLED डिस्प्ले मिळतो, जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह डिझाइन केला गेला आहे, त्यासोबत 120Hz चा रिफ्रेश रेट मिळत आहे. त्याबरोबरच, Qualcomm Snapdragon 778G+ चिपसेट फोनमध्ये उपलब्ध आहे. फोन 12GB RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेजसह समर्थित आहे. यात 4,500mAh बॅटरी मिळत आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :