Nothing लवकरच लाँच करणार आपला नवा स्मार्टफोन! टीजर पोस्टरमध्ये बघा पहिली झलक। Tech News

Updated on 04-Jun-2024
HIGHLIGHTS

लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Nothing ने आपल्या नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे.

Nothing Phone (3) बद्दल लीक्स अलीकडेच सोशल मीडियावर आले होते.

Nothing ने आपल्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवर नवीन डिव्हाइसचे लॉन्चिंग टीज केले आहे.

प्रसिद्ध आणि आपल्या अनोख्या पारदर्शक डिझाईनसाठी लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Nothing ने आपल्या नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. होय, Nothing Phone (3) बद्दल लीक्स अलीकडेच सोशल मीडियावर आले होते. मात्र, आता कंपनीने अधिकृतपणे नवीन डिव्हाईसचे लाँच टीज करण्यास सुरुवात केली आहे. होय, आज कंपनीने आपल्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवर नवीन डिव्हाइसचे लॉन्चिंग टीज केले आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या Nothing Phone (2) ही अपग्रेडेड आवृत्ती असू शकते. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात Nothing Phone (3) बद्दल सर्व तपशील-

Also Read: नव्या आकर्षक रंगात भारतात लाँच झाला लेटेस्ट OnePlus 12, जाणून घ्या किंमत आणि सर्व तपशील

Nothing Phone (3) चे टीजर

Nothing च्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हँडलवर काही पोस्ट शेअर करण्यात आले आहेत. यावरून समजते की, कंपनी लवकरच एक नवा स्मार्टफोन बाजारात लाँच करेल. तो Nothing Phone (3) किंवा Horizon स्मार्टफोन असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या कंपनीने स्मार्टफोनशी संबंधित कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

वरील पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता की, पहिल्या टीझर पोस्टरमध्ये कंपनीने 3,2,1 काउंटडाउन देणारा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये, डिव्हाइसचा एक भाग दिसतोय, ज्यामध्ये एक स्क्रू जोडलेला आहे. याव्यतिरिक्त, दुसऱ्या एका पोस्टमध्ये एका फोन इमोजीसह एक स्क्रू दिसत आहे. या दोन्ही पोस्ट्सवरून नव्या स्मार्टफोनची टीज कंपनीने सुरु केली आहे.

Nothing Phone (3) चे लीक्स

वर सांगितल्याप्रमाणे, आगामी Nothing Phone (3) बद्दल अनेक लीक्स पुढे आले आहेत. लीकनुसार या फोनची किंमत अंदाजे 45,000 रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते. याव्यतिरिक्त स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 6.7 इंच लांबीचहा फुल-HD+ LTPO OLED डिस्प्ले देण्यात येईल. तर, उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो.

त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पॉवरसाठी, या फोनची बॅटरी 4700mAh असेल, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :