अलीकडेच Nothing ने भारतात नवा CMF Phone (1) सादर करण्याची घोषणा केली होती. आता अखेर कंपनीने CMF Phone (1) भारतात लाँच करण्याची पुष्टी केली आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. हा स्मार्टफोन सर्वांच्या बजेटमध्ये येईल, असे देखील सांगण्यात आले आहे. या फोनच्या आगमनाने, Xiaomi, Vivo आणि Oppo सारख्या ब्रँडच्या मोबाईल फोनमध्ये जोरदार स्पर्धा मिळेल, असे म्हटले जात आहे.
फोनचा टीझर पाहता, फोनच्या मागील बाजूस लेदर फिनिश असेल, असे समजते. हा फोन केशरी रंगात उपलब्ध होईल. तसेच, कंपनीनुसार CMF Phone (1) ला एक उत्तम डिझाइन दिले जाईल, जे खूप आकर्षक असू शकते. सध्या या हँडसेटच्या डिझाईन आणि आकारमानाबद्दल अधिकृतपणे काही सांगता येत नाही. फोन लाँच झाल्यानंतरच योग्य ती माहिती पुढे येईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, आगामी CMF फोन (1) जुलैच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो, असा दावा काही अहवालांमध्ये केला जात आहे. या फोनची किंमत 23,290 रुपयांपासून सुरू होऊ शकते. एवढेच नाही तर, हा फोन ग्राहकांना अनेक कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल.
लीकनुसार, CMF Phone (1) ला 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच लांबीचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये MediaTek प्रोसेसर दिला जाऊ शकतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले जाईल.
याव्यतिरिक्त, हँडसेटमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP सेल्फी कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. तर, यामध्ये 5000mAH बॅटरी दिली जाऊ शकते, जी जलद चार्जिंगसह सुसज्ज असेल. कनेक्टिव्हिटीसाठी, हँडसेटमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे स्पेक्स दिले जाऊ शकतात. मात्र, फोनचे योग्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.