GOOGLE PIXEL 4 मध्ये असेल ड्यूल रियर कॅमेरा; माहिती आली समोर

GOOGLE PIXEL 4 मध्ये असेल ड्यूल रियर कॅमेरा; माहिती आली समोर

Google Pixel 4 सीरीज लॉन्च होण्यासाठी अजून 3-4 महिन्यांचा वेळ आहे. याआधी पण गूगल ने अशी माहिती दिली आहे कि हि सीरीज Pixel 4 नावाने येणार आहे आणि यात ड्यूल रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. 

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रुमर्स मध्ये असे बोलले जात होते कि या सीरीज मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे पण तसे काहीही होणार नाही. नेहमीप्रमाणे यावेळी पण ऑक्टोबरच्या आसपास ये फोन्स भारतीय बाजारात लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. 

विशेष म्हणजे आतापर्यंत समोर आलेल्या लीक आणि रुमर्स मध्ये असे सांगण्यात येत होते कि या फोन्स मध्ये तुम्हाला तीन कॅमेरा मिळणार आहेत, पण गूगलच्या या नवीन स्टेटमेंट नंतर सर्वकाही स्पष्ट झाले आहे. अर्थात् असे समोर आले आहे कि Google Pixel 4 मोबाईल फोन ड्यूल कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाणार आहे. या फोन मध्ये तुम्हाला कॅमेरा सेटअप तसाच मिळणार आहे जसा तुम्ही iPhone 11 मध्ये बघितला आहे. तसेच फोन मध्ये रियर पॅनलच्या बॉटमला कंपनीची ब्रॅण्डिंग दिसणार आहे.  
 

तसे पाहता आतापर्यंत Google Pixel 4 बद्दल अनेक लीक रिपोर्ट्स आणि बातम्या समोर आल्या आहेत. हे लीक रिपोर्ट्स पाहता स्मार्टफोन Google Pixel 4 मध्ये कंपनी फ्रंट कॅमेऱ्यासाठी डिवाइस मध्ये पंच होल डिस्प्ले देऊ शकते. तसेच अलीकडेच मिळालेल्या माहिती नुसार कंपनी आपल्या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये फ्रंट आणि मागे ड्यूल कॅमेरा सेटअप देऊ शकते. 

विशेष म्हणजे Google Pixel 4 सीरीज मध्ये Google Pixel 4XL स्मार्टफोन पण असेल आणि यात फ्रंटला ड्यूल कॅमेरा असल्याची बातमी मिळाली आहे. इतकेच नव्हे तर याआधी या अपकमिंग स्मार्टफोनचे screen protector लीक झाले होते ज्यात ड्यूल कॅमेरा स्लॉट दिसला होता. 

त्याचबरोबर असे समजले होत कि दोन्ही अपकमिंग स्मार्टफोन्स मध्ये ड्यूल फ्रंट कॅमेरा असेल. आता लॉन्चच्या आधी या स्मार्टफोनचे फोटो लीक झाल्यामुळे निश्चित झाले आहे कि Google Pixel 4 आणि Google Pixel 4XL स्मार्टफोन मध्ये फ्रंट आणि मागे ड्यूल कॅमेरा सेटअप असेल. 

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo