Nokia कंपनीचे फोन भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कारण कंपनी किफायती आणि परवडणारे फोन लाँच करण्यासाठी प्रसिद्ध आहे. Nokia ने Nokia XR21 फोन लाँच केला आहे. हा फोन कंपनीचा सर्वात मजबूत फोन आहे, असा दावा करण्यात आला आहे. चल तर मग जाणून घेऊयात फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
Nokia XR21ची किंमत
Nokia च्या या स्मार्टफोनची किंमत GBP 499 म्हणजेच अंदाजे 51 हजार 300 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनचा केवळ एक व्हेरिएंट (6GB+ 128GB) लाँच करण्यात आला आहे. नोकियाचा हा फोन पाइन ग्रीन आणि मिडनाईट ब्लॅक कलर खरेदीसाठी उपलब्ध असेल.
स्पेसिफिकेशन्स
हा फोन Nokia XR20 चा अपग्रेड व्हर्जन आहे. या डिव्हाइसमध्ये HD+ रिझोल्यूशनसह IPS डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 6.49 इंच लांबीचा आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G ऑक्टा कोर प्रोसेसर मिळत आहे. त्यासोबत ग्राफिक्ससाठी Adreno 619L GPU देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.
फोनमध्ये 4800 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जसाठी सपोर्टसह येईल. फोटोग्राफीसाठी, 64 मेगापिक्सल कॅमेरा, 8 मेगापिक्सेल कॅमेरा सेंसर मिळेल. हा सेन्सर अल्ट्रा वाइड लेन्ससह येतो. सेल्फीसाठी तुम्हाला 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.