HMD ग्लोबल वेगाने आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत आहे आणि सध्या कंपनीने वेगवेगळ्या किंमतीत अनेक मोबाईल फोन्स पण सादर केले आहेत. नुकतेच कंपनीने Nokia X5 (Nokia 5.1 Plus) आणि Nokia X6 (Nokia 6.1 Plus) चीन मध्ये लॉन्च केले होते आणि आता HMD ग्लोबल ने चीन मध्ये आपला नोकिया एक्स7 स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे.
Nokia X7 ची किंमत
नोकिया एक्स7 ग्लोबली आणि भारतात Nokia 7.1 Plus नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. स्मार्टफोन रेड, सिल्वर, मिडनाईट ब्लॅक आणि डार्क ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. डिवाइसच्या 4GB रॅम वेरिएंटची किंमत RMB 1,699 (जवळपास Rs 18,150) आणि 6GB रॅम वेरिएंटची किंमत RMB 1,999 (जवळपास Rs 21,350) ठेवण्यात आली आहे, टॉप वेरिएंट बद्दल बोलायचे झाले तर 128GB स्टोरेज वेरिएंट RMB 2,499 (जवळपास Rs 26,700) मध्ये सादर करण्यात आला आहे. चीन मध्ये हे मोबाईल फोन्स 23 ऑक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होतील.
नवीन नोकिया फोन्स मध्ये फ्रंट आणि बॅक ग्लास डिजाइन आणि एज-टू-एज डिस्प्ले आहे तसेच हे नॉच डिस्प्ले आहेत ज्यात इयरपीस, फ्रंट कॅमेरा, प्रोक्सिमिटी सेंसर आणि एम्बिएंट लाइट सेंसर देण्यात आले आहेत. डिवाइसच्या बॅकला डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात कंपनीने ZEISS ऑप्टिक्स लेंस चा वापर केला आहे. जी फोटोग्राफी साठी उत्तम आहे.
Nokia X7 चे स्पेसिफिकेशन
नोकिया एक्स7 मध्ये 6.18 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 2246×1080 पिक्सल आहे आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 18.7:9 आहे. स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 SoC, ओक्टा-कोर CPU आणि एड्रेनो 616 GPU आहे. डिवाइस तीन वेरिएंट्स, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज, 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज तसेच 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे.
फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर डिवाइसच्या बॅक वर देण्यात आलेल्या डुअल कॅमेरा सेटअप मध्ये 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. सेकेंडरी सेंसर टेलीफोटो लेंस सह येतो ज्याचा वापर झूम आणि पोर्ट्रेट मोड साठी केला जाऊ शकतो. कॅमेरा AI सीन डिटेक्शनला सपोर्ट करतो जो 18 वेगवेगळे सीन डिटेक्ट करून फोटो ऑप्टिमाइज करू शकतो. याव्यतिरिक्त कॅमेरा अॅप मध्ये AI पोर्ट्रेट मोड आणि स्टूडियो लाइट इफेक्ट्स पण देण्यात आले आहेत. डिवाइसच्या फ्रंटला 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Nokia X7 मधील कनेक्टिविटी
कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन डुअल सिम कार्ड स्लॉट्स, ब्लूटूथ, 4G LTE VoLTE आणि USB टाइप-C पोर्ट सह येतो. डिवाइस मध्ये 3,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंग फीचर सह सादर करण्यात आली आहे. स्मार्टफोन मध्ये 3.5mm ऑडियो सॉकेट पण देण्यात आला आहे आणि हा Nokia च्या OZO स्टीरियो रिकॉर्डिंग ला पण सपोर्ट करतो. सॉफ्टवेयर पाहता नोकिया एक्स7 एंड्राइड 8.1 ओरियो सह सादर करण्यात आला आहे आणि हा एंड्राइड 9 पाई वर अपग्रेड पण केला जाईल.