Nokia X6 ग्लोबल एडिशन ब्लूटूथ सर्टिफिकेशन च्या माध्यमातून झाला कन्फर्म, जाणून घ्या कसे असतील याचे फीचर्स

Nokia X6 ग्लोबल एडिशन ब्लूटूथ सर्टिफिकेशन च्या माध्यमातून झाला कन्फर्म, जाणून घ्या कसे असतील याचे फीचर्स
HIGHLIGHTS

Nokia X6 ग्लोबली लॉन्च करण्यासाठी कंपनी चे CPO ने ट्विटर वर एक पोल केला होता, ज्यात लोकांना विचारण्यात आले होते की हा डिवाइस ग्लोबली लॉन्च केला जावा की नाही. उत्तर म्हणून कंपनीला ‘हो’ मिळाला आहे.

Nokia X6 Global version to launch soon: HMD Global ने चीन मध्ये Nokia X6 स्मार्टफोन आता काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आला आहे, आता समोर येत आहे की हा डिवाइस ग्लोबली पण लॉन्च केला जाऊ शकतो, अर्थात् लवकरच आपल्याला याचा एक अंतरराष्ट्रीय वेरिएंट पण बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे ही माहिती ब्लूटूथ सर्टिफिकेशन साइट वरून आली आहे. फक्त चीनी बाजारात हा स्मार्टफोन लॉन्च केला गेल्यामुळे जगभरातील इतर यूजर्स खुप निराश झाले होते. 
हे योग्य रित्या सिद्ध करण्यासाठी कंपनी ने ट्विटर वर एक पोल केला होता, ज्यात लोकांना विचारण्यात आले होते की हा डिवाइस ग्लोबली लॉन्च केला जावा की नाही. उत्तर म्हणून कंपनीला ‘हो’ मिळाला आहे. हे सकारात्मक उत्तर बघून कंपनी ने आता हा डिवाइस जगभरात लॉन्च करण्याचे ठरवले आहे. याचा पहिला पुरावा यावरुन मिळाला आहे की हा डिवाइस ब्लूटूथ सर्टिफिकेशन वर दिसला आहे. 

या वेबसाइट नुसार, नोकिया चा ग्लोबल वर्जन आता लॉन्च साठी तयार आहे, जो मॉडेल नंबर TA-1083 आणि TA-1116 नावाने दिसत आहे. मास्को मध्ये होणार्‍या HMD ग्लोबल च्या एका इवेंट च्या आधी मॉडेल नंबर TA-1116 रशिया आणि तैवान च्या वेबसाइट वर दिसला होता. याचा अर्थ असा की चीन नंतर या देशांमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला जाऊ शकतो. 

या डिवाइस च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला तर माहितीच आहे हा चीन मध्ये काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आला होता. तिथे हा डिवाइस एंड्राइड 8.1 Oreo सह लॉन्च करण्यात आला आहे, हा डिवाइस को 5.8-इंचाच्या FHD+ 1080×2280 पिक्सल रेजोल्यूशन च्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, हा डिवाइस 2.5D कर्व ग्लास डिस्प्ले आणि गोरिला ग्लास 3 ने सुरक्षित पण करण्यात आला आहे. 

फोन मधील कॅमेरा पाहता यात एक ड्यूल कॅमेरा सेटअप आहे, जो 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन वेगवेगळ्या सेंसर चा कॉम्बो आहे. फोन च्या फ्रंटला एक 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला. फोन च्या स्टोरेज बद्दल बोलायचे तर ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येते. फोन मध्ये एक 3060mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, तसेच यात कनेक्टिविटी साठी सर्व काही आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo