Nokia 11 जुलै ला होणार्‍या आपल्या इवेंट मध्ये लॉन्च करेल Nokia X5 स्मार्टफोन, Helio P60 सह येण्याची शक्यता

Updated on 09-Jul-2018
HIGHLIGHTS

काही दिवसांपूर्वी समोर आले होते की 11 जुलै ला Nokia चीन मध्ये एका इवेंट चे आयोजन करणार आहे, आता याबद्दल अधिकृत माहिती आली आहे.

Nokia X5 or Nokia 5.1 to launch in 11 July Event in China here to know everything about the Device: काही दिवसांपूर्वी किंवा असे पण म्हणू शकतो की मागच्याच आठवड्यात असे समजले की नोकिया कडून चीन मध्ये 11 जुलै ला एका इवेंट चे आयोजन करण्यात येणार आहे, आता या लॉन्च इवेंट संबंधी एक अधिकृत इनवाइट वेइबो च्या वेबसाइट वर दिसला आहे. असे समोर येत आहे की या इवेंट मध्ये कंपनी कडून Nokia 5.1 Plus स्मार्टफोन लॉन्च केला जाऊ शकतो, दुसरीकडे असे पण समजत आहे की हा डिवाइस Nokia X5 (2018) नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच या मीडिया इनवाइट नुसार हा डिवाइस Nokia च्या X सीरीज अंतर्गत लॉन्च केला जाईल. 

मागच्याच आठवड्यात Nokia 5.1 प्लस म्हणजेच Nokia X5 संबधित एक प्रोमो पोस्टर समोर आला होता, हा लीक Baidu च्या माध्यमातून दिसला होता. या पोस्टर मधून असे पण समोर आले होते की डिवाइस 32GB स्टोरेज सह CNY 799 म्हणजे जवळपास Rs 8,289 च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो त्याचबरोबर या डिवाइस चा 64GB स्टोरेज वेरिएंट CNY 999 म्हणजे जवळपास Rs 10,364 च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. पण ही किंमत भारतात आणि इतर बाजारांमध्ये (China सोडून) जास्त असू शकते. 

हा प्रोमो पोस्टर पाहता हा डिवाइस नॉच डिजाईन सह दिसला आहे, तसेच हा TENAA च्या लिस्टिंग मध्ये पण असाच दिसला आहे. मागील रिपोर्ट्स पाहता Nokia X5 म्हणजे Nokia 5.1 Plus स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 600 सीरीज च्या प्रोसेसर सह लॉन्च केला जाऊ शकतो, तसेच हा Helio P60 प्रोसेसर सह पण येऊ शकतो. फोन 3GB, 4GB रॅम व्यतिरिक्त 6GB रॅम वेरिएंट मध्ये पण लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच यात 32GB सोबत 64GB इंटरनल स्टोरेज पण मिळण्याची शक्यता आहे. 

फोन मध्ये तुम्हाला एक 5.86-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे, हा 720×1520 पिक्सल रेजोल्यूशन च्या स्क्रीन सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता. यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा मिळू शकतो. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :