लाँच होताच Nokia X30 5Gने घातला धुमाकूळ, OnePlus 11R ला खुले आव्हान
Nokia X30 5G भारतात लाँच
Nokia X30 5G ची OnePlus 11R कडून कठीण स्पर्धा
Nokia X30 5G ची किंमत 48,999 रुपये आहे.
Nokia X30 5G लाँच करण्यात आला आहे आणि नोकिया ब्रँडचा हा फोन 100% ऍल्युमिनियम फ्रेम आणि 65% रिसायकल प्लास्टिक बॅकपासून बनलेला आहे. अलीकडेच अनेक स्मार्टफोन बाजारात लॉन्च झाले आहेत आणि आज आम्ही या महिन्यात लॉन्च झालेल्या OnePlus 11R सोबत या नवीन फोनची तुलना करणार आहोत. बघुयात दोन्ही फोनचे सविस्तर तपशील…
हे सुद्धा वाचा : एका प्लॅनमध्ये दोघांच्या रिचार्जची सुट्टी, बघा Vi चा अप्रतिम प्लॅन
डिस्प्ले
Nokia X30 5G 6.43-इंच FHD + AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल आहे.
दुसरीकडे, OnePlus 11R 6.74-इंचाच्या डिस्प्लेसह सुसज्ज आहे आणि त्याचे रिझोल्यूशन 2772×1240 पिक्सेल आहे.
कॅमेरा
Nokia X30 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल + 13 मेगापिक्सलचे दोन सेन्सर उपलब्ध आहेत. फोनच्या पुढील बाजूस 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.
OnePlus 11R मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स आणि क्लोज-अप शॉट्ससाठी 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. डिव्हाइसमध्ये 16-मेगापिक्सेल सेल्फी शूटर देखील आहे.
परफॉर्मन्स
Nokia X30 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटद्वारे समर्थित आहे आणि फोनला 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. स्मार्टफोन Android 12 सह लॉन्च केला गेला आहे
OnePlus 11R क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटद्वारे समर्थित आहे जो 256GB 12GB, 256GB 16GB आणि 512GB 16GB स्टोरेज पर्यायांसह जोडलेला आहे. हा नवीन Android 13OS वर चालतो.
बॅटरी
Nokia X30 मध्ये 4200mAh बॅटरी मिळत आहे जी 33w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते तर OnePlus 11R 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देते.
किंमत
Nokia X30 5G ची किंमत 48,999 रुपये आहे. तर, OnePlus 11R ची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile