तब्बल 12,000 रुपयांनी स्वस्त झाला NOKIAचा 5G फोन, जाणून घ्या नवीन किंमत
Nokia X30 5G फोन 12,000 रुपयांनी स्वस्त
हा एक इको-फ्रेंडली स्मार्टफोन आहे.
नवीन किंमत कंपनीच्या साइटवर लाईव्ह
Nokia X30 5G स्मार्टफोन या वर्षी फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्यात आला होता. ''हा एक इको-फ्रेंडली स्मार्टफोन आहे, जो रिसायकल मटेरियलपासून बनवला गेला आहे'' असे सांगितले गेले होते. लाँच नंतर केवळ दोन महिन्यांनी कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने स्मार्टफोनची किंमत तब्बल 12,000 रुपयांनी कमी केली आहे.
Nokia X30 5G नवी किंमत
कंपनीने नोकिया X30 5G स्मार्टफोन भारतात फेब्रुवारी 2023 मध्ये 48,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला होता. क्लाउडी ब्लू आणि आइस व्हाईट या दोन कलर ऑप्शन्समध्ये फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. दरम्यान, आता कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 12,000 रुपयांनी कमी केली आहे. आता तुम्हाला हा फोन फक्त 36,999 मध्ये खरेदी करता येणार आहे. नवीन किंमत कंपनीच्या साइटवर लाईव्ह झाली आहे.
Nokia X30 5G
Nokia X30 5G फोन 6.43-इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश दर 90Hz आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे. तसेच, यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोन 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजने सज्ज आहे. तसेच, यात स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर आहे.
याव्यतिरिक्त, फोनमध्ये बॅटरी 4,200mAhची आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. फोटोग्राफीसाठी 50MP प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह येतो. यासोबत 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर उपलब्ध आहे. त्याबरोबरच, कंपनीने फोनमध्ये 16MP कॅमेरा दिला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile