अनोखी ऑफर ! महागडे फोन घेण्याचे टेन्शन विसरा, NOKIA रेंटवर देतोय प्रीमियम 5G स्मार्टफोन

अनोखी ऑफर ! महागडे फोन घेण्याचे टेन्शन विसरा, NOKIA रेंटवर देतोय प्रीमियम 5G स्मार्टफोन
HIGHLIGHTS

NOKIA आपला प्रीमियम आणि इको-फ्रेंडली स्मार्टफोन X30 5G रेंटवर देतेय.

नोकियाची ही रेंटल सर्व्हिस किमान तीन महिन्यांसाठी घ्यावी लागेल.

कंपनी या सर्व्हिसदरम्यान हरवलेले किंवा खराब झालेले डिव्हाइस बदलण्याची ऑफर देखील देत आहे.

Nokiaने युजर्ससाठी एक अनोखी ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनीचा इको-फ्रेंडली स्मार्टफोन Nokia X30 5G भाड्याने वापरता येईल. नोकियाच्या या फोनची सुरुवातीची किंमत $520 म्हणजेच सुमारे 42,300 रुपये आहे, परंतु वापरकर्ते दरमहा $25 म्हणजेच सुमारे 2,033 रुपये भाडे देऊन देखील वापरू शकतात. नोकियाची ही रेंटल सर्व्हिस किमान तीन महिन्यांसाठी घ्यावी लागणार आहे. कंपनी या सर्व्हिसदरम्यान हरवलेले किंवा खराब झालेले डिव्हाइस बदलण्याची ऑफर देखील देत आहे.

हे सुद्धा वाचा : आता TVवर देखील टिकटॉक स्टाईल व्हिडिओ पाहता येतील, YouTubeचे नवीन अप्रतिम फीचर बघा…

 कंपनीचा हा फोन लवकरच भारतातही दाखल होणार आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की, कंपनी ही योजना भारतीय वापरकर्त्यांना देखील देईल. चला तर मग नोकियाच्या या इको-फ्रेंडली फोनमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊयात…

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स : 

फोनमध्ये, कंपनी 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंच फुल HD + डिस्प्ले देत आहे. 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह येतो. Nokia X30 5G 8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यामध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देत आहे.

अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह हा 5G फोन 4200mAh बॅटरीने समर्थित आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन Android 12 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी 5G व्यतिरिक्त या फोनमध्ये फेस अनलॉक, eSIM, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासह 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo