नवीन आणि अप्रतिम फोन खरेदी करण्यासाठी इच्छित आहात? आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. Nokia X30 5G च्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड Nokia ने हा प्रीमियम फोन फेब्रुवारी 2023 मध्ये वर्षाच्या सुरुवातीला लाँच केला होता. ज्याची किंमत कंपनीने भारतीय बाजारात 48,999 रुपये निश्चित केली होती. चला तर मग जाणून घेऊयात फोनची नवीन किंमत आणि इतर सर्व तपशील.
वर सांगितल्याप्रमाणे, हा स्मार्टफोन भारतात 48,999 रुपयांच्या किंमतीसह दाखल झाला होता. आता तुम्ही Nokia X30 5G फक्त 36,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कपातीनंतर हा फोन 12,000 रुपयांपर्यंतच्या बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. हा फोन Nokia च्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon India वर नवीन किंमतीसह सूचीबद्ध केला गेला आहे. आइस व्हाईट आणि क्लाउडी ब्लू कलर पर्यायांसह उपलब्ध करण्यात आला होता.
नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये 6.43 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. याव्यतिरिक्त, प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस आहे. यात Qualcomm Octa-Core Snapdragon 695 प्रोसेसर आहे. या प्रोसेसरसह हाय बॅण्डविथ, लो लेटेन्सी कनेक्शन, सिमलेस प्रोडक्टिव्हिटी आणि इंटरटेंमेंट मिळेल. यासोबतच कंपनीने या फोनला 8GB रॅम आणि 256GB इनबिल्ट स्टोरेज दिले आहे.
यात 33W फास्ट चार्जिंगसह 4200mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 10 तास 30 मिनिटपर्यंत चालेल. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी मागील सेन्सर असेल, जो OIS सपोर्टसह येईल. त्यारबोबरच, फोनमध्ये 13MP ची अल्ट्रा-वाइड लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Android 12 वर चालेल. यासह, तीन वर्षांसाठी ओएस अपडेट्सशिवाय, कंपनी तीन वर्षांसाठी मंथली सुरक्षा पॅच देखील देईल. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5.1, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट असेल. यासोबतच, सिक्योरिटीसाठी यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर्सचा समावेश आहे.