Nokia X स्मार्टफोन Nokia ब्राण्ड चा पहिला स्मार्टफोन होता जो एंड्राइड OS सह लॉन्च झाला होता.
HMD ग्लोबल 27 एप्रिलला चीन मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे आणि करने लेटेस्ट रिपोर्ट नुसार हा फोन जुन्या Nokia X चे नवीन वर्जन असेल. ओरिजिनल Nokia X स्मार्टफोन 2014 मध्ये लॉन्च करण्यात आला होता, त्यावेळी Nokia ला Microsoft ने विकत घेतले होते आणि जास्तीत जास्त डिवाइस विंडोज प्लॅटफॉर्म वर चालत होते. 2014 मध्ये लॉन्च झालेला Nokia X स्मार्टफोन Nokia ब्राण्ड चा पहिला स्मार्टफोन होता जो एंड्राइड OS सह लॉन्च झाला होता. ओरिजिनल Nokia X एंड्राइड 4.1.2 जेली बीन वर चालत होता, पण त्यावर एक हेवी स्किन देऊन याला विंडोज फोन OS प्रमाणे बनवण्यात आले होते. या फोन मध्ये गूगल प्ले स्टोर नव्हता, याचा अर्थ असा यूजर्स या फोन मध्ये सहज अॅप्स इंस्टाल करू शकत नव्हते. पण फोन मध्ये एक वेगळा अॅप स्टोर होता, ज्यात ते अॅप्स होते जे डिवाइस वर सहज पणे चालू शकत होते आणि त्याचबरोबर यूजर्स इतर कोणतेही अॅप साइडलोड करू शकत होते पण त्यासाठी APK फाइल्स असण्याची गरज होती. हा फोन एक बजेट डिवाइस होता आणि यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन S4 प्ले चिपसेट, 512MB रॅम आणि 4GB स्टोरेज होती. हे स्पेसिफिकेशंस त्यावेळी बेस्ट बजट-ग्रेड स्पेसिफिकेशंस होते. GizmoChina च्या रिपोर्ट नुसार काही लोकांनी मॉल मध्ये डिजिटल होर्डिंग्स बघितले आहेत ज्यात फोन दाखविण्यात आला आहे. या जाहिरातीची स्क्रिप्ट इंग्रजी आणि चीनी भाषेमध्ये आहे आणि यावरुन समोर येत आहे की 27 एप्रिलला लॉन्च होणारा हा डिवाइस Nokia X असेल. फोनचा लुक बघुन अनुमान लावला जाऊ शकतो की नवीन Nokia X एक कॉम्पॅक्ट बजेट डिवाइस असेल. 27 एप्रिलला फोन लॉन्च झाल्यानंतरच या डिवाइस बद्दल काही बोलले जाऊ शकते.