Nokia X स्मार्टफोन च्या बाबतीत CCC च्या लिस्टिंग वरून समोर येत आहे की हा डिवाइस लो-एंड डिवाइस च्या रुपात लॉन्च केला जाऊ शकतो.
Nokia च्या एका स्मार्टफोन बद्दल खुप काळापासून चर्चा होत आहे, हा डिवाइस आपण Nokia X नावाने ओळखतो. पण अजूनपर्यंत या डिवाइस ला अधिकृत कन्फर्मेशन मिळाले नाही, पण हा डिवाइस आता चीन च्या सर्टिफिकेशन वेबसाइट वायरलेस अथॉरिटी चाइना कम्पलसरी सर्टिफिकेशन वर दिसला आहे. इथे या डिवाइस ची किंमत समोर आली आहे. त्याचबरोबर असे पण बोलले जात आहे की हा डिवाइस कंपनी कडून 10W च्या चार्जर सह लॉन्च केला जाणार आहे. तसेच या डिवाइस लॉन्च बद्दल बोलायचे झाले तर हा चीन मध्ये 27 एप्रिलला लॉन्च केला जाऊ शकतो. ओरिजिनल Nokia X एंड्राइड 4.1.2 जेली बीन वर चालत होता, पण त्यावर एक हेवी स्किन देऊन याला विंडोज फोन OS प्रमाणे बनवण्यात आले होते. या फोन मध्ये गूगल प्ले स्टोर नव्हता, याचा अर्थ असा यूजर्स या फोन मध्ये सहज अॅप्स इंस्टाल करू शकत नव्हते. पण फोन मध्ये एक वेगळा अॅप स्टोर होता, ज्यात ते अॅप्स होते जे डिवाइस वर सहज पणे चालू शकत होते आणि त्याचबरोबर यूजर्स इतर कोणतेही अॅप साइडलोड करू शकत होते पण त्यासाठी APK फाइल्स असण्याची गरज होती. हा फोन एक बजेट डिवाइस होता आणि यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन S4 प्ले चिपसेट, 512MB रॅम आणि 4GB स्टोरेज होती. हे स्पेसिफिकेशंस त्यावेळी बेस्ट बजट-ग्रेड स्पेसिफिकेशंस होते.
काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट नुसार काही लोकांनी मॉल मध्ये डिजिटल होर्डिंग्स बघितले आहेत ज्यात फोन दाखविण्यात आला आहे. या जाहिरातीची स्क्रिप्ट इंग्रजी आणि चीनी भाषेमध्ये आहे आणि यावरुन समोर येत आहे की 27 एप्रिलला लॉन्च होणारा हा डिवाइस Nokia X असेल. फोनचा लुक बघुन अनुमान लावला जाऊ शकतो की नवीन Nokia X एक कॉम्पॅक्ट बजेट डिवाइस असेल. 27 एप्रिलला फोन लॉन्च झाल्यानंतरच या डिवाइस बद्दल काही बोलले जाऊ शकते.