digit zero1 awards

Nokia Upcoming Smartphone: 6 सप्टेंबरला कंपनी लाँच करेल नवा 5G फोन, टीझर Video मध्ये दिसली झलक

Nokia Upcoming Smartphone: 6 सप्टेंबरला कंपनी लाँच करेल नवा 5G फोन, टीझर Video मध्ये दिसली झलक
HIGHLIGHTS

Nokia कंपनी लवकरच भारतात 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे.

हा Nokia 5G स्मार्टफोन 6 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होईल.

हा कंपनीचा मिड-रेंज सेगमेंट स्मार्टफोन असू शकतो, जो 5G कनेक्टिव्हिटीसह येईल.

Nokia कंपनी लवकरच भारतात 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने लेटेस्ट आणि आगामी स्मार्टफोनबद्दल टीझर जारी केला आहे. टिझर Video द्वारे कंपनीने ही माहिती दिली आहे. स्मार्टफोन लॉन्च घोषणेसह कंपनीने लाँच डेटची देखील पुष्टी केली आहे. हा Nokia 5G स्मार्टफोन 6 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होईल. 

आता आगामी स्मार्टफोनचे नाव काय? असा तुम्हाला प्रश्न पडत असेल. पण सध्या कंपनीने या स्मार्टफोनचे नाव पडद्याआड ठेवले आहे. मात्र, असे मानले जात आहे की हा कंपनीचा मिड-रेंज सेगमेंट स्मार्टफोन असू शकतो, जो 5G कनेक्टिव्हिटीसह दाखल होईल. लाँच डेटसह टीझर व्हिडिओमध्ये फोनची थोडीशी झलक देखील बघायला मिळत आहे.

 

 

Nokia Upcoming Smartphone

Nokia India ने त्यांच्या मायक्रोब्लॉगिंग X (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. या टीझर व्हिडिओमध्ये, कंपनीने पुष्टी केली आहे की, ते 6 सप्टेंबर 2023 रोजी भारतात एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच करणार आहेत. सध्या फोनच्या नावावर पडदा ठेवण्यात आला आहे. 6 सप्टेंबर रोजी कोणता Nokia 5G फोन लॉन्च होईल हे कंपनीने उघड केलेले नाही, पण तुम्ही टिझर व्हीडिओमध्ये फोनची झलक बघू शकता. 

वरील टीझर व्हिडिओबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या स्लाइडमध्ये कंपनी आगामी स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या स्पीडबद्दल माहिती देत ​​आहे. तर, दुसऱ्या स्लाइडमध्ये लाँच डेट निश्चित  करण्यात आली आहे. टीझर व्हिडिओमध्ये फोनचे एजेस दिसत आहेत. लॉन्च डेट आणि फोनच्या थोड्या डिझाईन व्यतिरिक्त टिझरमध्ये या स्मार्टफोनशी संबंधित इतर कोणतीही माहिती सध्या देण्यात आलेली नाही. आगामी फोनबद्दल अधिकृत महितीसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo