Nokia X6 स्मार्टफोन जुन्या मॉडेल पेक्षा पूर्णपणे वेगळा असेल, हा दोन वेगवेगळ्या वेरिएंटस वेगवेगळ्या चिपसेट सह लॉन्च होऊ शकतो.
खुप दिवस झाले असे रुमर्स येत आहेत की Nokia आपल्या X सीरीज वर काम करत आहे, असे पण समोर आले आहे की या सीरीज चा एक स्मार्टफोन लवकरच लॉन्च केला जाईल. आता चीनी मीडिया च्या माध्यमातून असे समोर येत आहे की ही बातमी खरी आहे. MyDrivers वेबसाइट चा एक रिपोर्ट पाहिला तर त्यानुसार, कंपनी आपल्या X सीरीज चे स्मार्टफोंस लॉन्च करण्याची पुरेपूर तयारी करत आहे आणि कंपनी कडून 27 एप्रिल ला एक नवीन डिवाइस Nokia X6 लॉन्च केला जाऊ शकतो. आता कदाचित तुम्हाला वाटेल की हा काही वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या Nokia X6 स्मार्टफोन जो सिम्बियन ओएस वर लॉन्च केला गेला होता त्याचे अपग्रेड वर्जन असेल तर तसे नाही. या डिवाइस ला फक्त त्या जुन्या डिवाइस चे नाव देण्यात आले आहे. नाहीतर हा एक पूर्णपणे नवीन फोन आहे, जो नवीन स्पेक्स आणि फीचर्स सह लॉन्च केला जाणार आहे. या रिपोर्ट नुसार, हा फोन दोन वेगवेगळ्या वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो आणि या दोन्ही मध्ये कंपनी वेगवेगळे चिपसेट देईल. एका मॉडेल मध्ये स्नॅपड्रॅगन 636 असेल तर दुसरा मॉडेल मीडियाटेक P60 सह लॉन्च केला जाईल. तसेच एका मॉडेल मध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप असेल, पण दुसर्या वेरिएंट मध्ये हाच कॅमेरा असेल की नाही याची माहिती अजून समोर आली नाही.
फोन मध्ये एक 5.8-इंचाचा 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले असेल, सोबतच यात 4GB रॅम सह 6GB रॅम वेरिएंट मध्ये पण लॉन्च केले जाऊ शकते. त्याचबरोबर असे पण बोलले जात आहे की हा फोन Nokia 6 आणि Nokia 7 मध्ये कुठे तरी येईल. याच्या 4GB मॉडेल ची किंमत 255 डॉलर म्हणजे जवळपास Rs 16,974 आणि 6GB मॉडेल ची किंमत 285 डॉलर म्हणजे जवळपास Rs 18,971 असण्याची शक्यता आहे. पण या किंमतीत लॉन्च च्या वेळी बदल नक्की होऊ शकतो.