सर्वच स्मार्टफोन्सला मागे टाकणार नोकियाचा ४२ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन

सर्वच स्मार्टफोन्सला मागे टाकणार नोकियाचा ४२ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन जानेवारीत लाँच केला जाईल, असे सांगितले जातय. त्याशिवाय हा स्मार्टफोन एक लॅपटॉप म्हणूनही वापरु शकता असेही सांगितले जातय .

ब-याच काळानतर सर्व नोकियाच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबरी समोर आली आहे. प्रदीर्घ काळानंतर नोकिया बाजारात येत आहे. त्यासाठी एक कॉन्सेप्ट फोन नोकिया स्वानसुद्धा समोर येत आहे. त्याचबरोबर असेही सांगितले जातय की, कॉन्सेप्ट फोन्सच्या दुनियेत हा स्मार्टफोन आपल्यातच एक मिसाल कायम ठेवू शकतो.

 

ह्या स्मार्टफोनला जानेवारीमध्ये लाँच केले जाईल. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनला एक लॅपटॉप म्हणूनही वापरु शकता. त्याशिवाय ह्यात 42MP कॅमेरा असेल, जो आतापर्यंत सर्वात मोठा कॅमेरा असल्याचे सांगितले जातय. त्याचबरोबर हा 4GB रॅमसह आकर्षक डिझाईन सादर करणार आहे. नोकिया स्वानमध्ये क्वाड-कोर CPU सह इंटेलची चिप असणाराय. तसेच ह्यात आपल्याला 128GB चे अंतर्गत स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन नोकिया स्वान स्मार्टफोन आणि टॅबलेटचे एक संपुर्ण मिश्रण असेल.

 

ह्यात ५.३ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याला वाढवून ११ इंचाची बनवू शकतो. नोकिया ह्या स्मार्टफोनमध्ये आणखी शानदार स्मार्टफोन्स बाजारात आणू शकता. ह्याआधी अशी अफवा येत होती की, नोकियाा अॅनड्रॉईड डिवाईस C1 बाजारात आणेल आणि आता असे सांगितले जातय की, नोकिया आपले अनेक नवीन स्मार्टफोन्स बाजारात आणून हंगामा करणार आहे.

 

नोकिया C1 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिमवर चालेल अशी माहिती मिळतेय. ह्या फोनमध्ये ५ इंचाची पुर्ण एचडी डिस्प्ले असेल. एवढंच नाही तर ह्या फोनमध्ये २जीबी रॅम असेल. त्याचबरोबर नोकिया C1 स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये इंटेलचे चिपसेट लावले असेल.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo