लवकरच भारतता येऊ शकतो नोकियाचा हा नवीन फोन

Updated on 27-Nov-2018
HIGHLIGHTS

HMD ग्लोबल साठी 2018 हे वर्ष चांगले गेले आहे, यावर्षी कंपनी ने अनेक चांगले स्मार्टफोन्स पण लॉन्च केले आहेत, यावर्षी कंपनी चा लेटेस्ट फोन नोकिया 7.1 आहे.

HMD ग्लोबल साठी 2018 हे वर्ष चांगले गेले आहे, यावर्षी कंपनी ने अनेक चांगले स्मार्टफोन्स पण लॉन्च केले आहेत, यावर्षी कंपनी चा लेटेस्ट फोन नोकिया 7.1 आहे. पण आता असे वाटते आहे की येत्या काही दिवसांत कंपनी नोकिया फॅन्स साठी नवीन फोन आणणार आहे. पण अधिकृतपणे काही समोर आले नाही. परंतु काही रिपोर्ट्स म्हणतात की हा फोन नोकिया 8.1 प्लस असू शकतो. हा Nokia 7.1 चा नवीन मोबाईल फोन असू शकतो. याचा अर्थ असा की भारतात नोकिया 8.1 लवकरच येऊ शकतो. एक ट्विट करून कंपनी ने आपल्या नवीन आगामी फोन बद्दल माहिती दिली आहे. 

Nokia 7.1 Plus पण केला जाऊ शकतो लॉन्च

Nokia 7.1 Plus मोबाईल फोन बद्दल आधीपण अनेकदा माहिती समोर आली आहे. पण नवीन माहिती समोर येत आहे की फोन मध्ये तुम्हाला एक 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला नॉच डिस्प्ले मिळणार आहे, तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप मिळणार आहे आणि यात स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट मिळणार आहे. तसेच स्मार्टफोन अनेक वेगवेगळ्या रंगात सादर केला जाऊ शकतो. 

 

जसे की या लीक मध्ये म्हणजे हँड्स-ऑन फोटो मधून समोर येत आहे की फोन नवीन रंगात दिसत आहे. असे पण समोर येत आहे की फोन वेगवेगळ्या दोन स्टोरेज आणि रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. पहिला Notch डिस्प्ले अर्थात Nokia 7.1 Plus स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो आणि दुसरा नॉच वीना Nokia 7.1 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. 

हे दोन्ही स्मार्टफोन्स म्हणजे नोकिया 7.1 आणि नोकिया 7.1 प्लस स्मार्टफोन्स क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट व्यतिरिक्त ड्यूल कॅमेरा, आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च केले जाऊ शकतात. तसेच हे मोबाईल्स 4GB/6GB रॅम सोबत 64GB स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केले जाऊ शकतात, त्याचबरोबर तुम्हाला माइक्रोएसडी कार्ड स्लॉट पण दिला जाईल.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :