Nokia स्मार्टफोन आणि एक्सेसरीज आता भारतातील कंपनी च्या अधिकृत वेबसाइट वर पण उपलब्ध
Nokia आपल्या सर्व डिवाइस ची शिपिंग तुम्हाला मोफत देत आहे, याव्यतिरिक्त कंपनी कडून तुम्हाला 10-दिवासांची रिटर्न पॉलिसी पण मिळत आहे. तसेच कंपनी च्या वेबसाइट वरून कोणताही डिवाइस विकत घेताना कंपनी पेमेंट प्रोटेक्शन पण देत आहे.
HMD ग्लोबल आता भारतात Nokia स्मार्टफोन, फीचर फोन आणि अन्य एक्सेसरीज कंपनी च्या अधिकृत वेबसाइट वरून विकत घेण्याची संधी तुम्हाला देत आहे, याचा अर्थ असा की आता तुम्ही हे डिवाइस इत्यादी भारतातील कंपनी च्या अधिकृत वेबसाइट वरून पण विकत घेऊ शकता. कंपनी ने आता कंपनी च्या भारतातील अधिकृत वेबसाइट वर आपले प्रोडक्ट्स लिस्ट केले आहेत, पण यातील सर्वच अजूनपर्यंत विकत घेण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत. यातील नेमके काही तुम्ही विकत घेऊ शकता.
सध्यातरी Nokia 8, Nokia 5, Nokia 3 आणि Nokia 2 स्मार्टफोनला कंपनी च्या अधिकृत वेबसाइट च्या माध्यमातून स्मार्टफोन सेक्शन मध्ये जाऊन विकत घेऊ शकता. तसेच Nokia 6 (2017) आणि Nokia 6 (2018) स्मार्टफोंस पण या लिस्टिंग मध्ये ठेवण्यात आले आहेत पण ते विक्रीसाठी उपलब्ध नाहीत.
फीचर फोंस बद्दल बोलायाचे झाले तर Nokia 3310 ड्यूल सिम, Nokia 150 ड्यूल सिम, Nokia 105 ड्यूल आणि सिंगल सिम, Nokia 230 ड्यूल सिम, Nokia 130 आणि Nokia 216 ड्यूल सिम हे फोंस इथे सेल साठी ऊपलब्ध आहेत. पण कंपनी ने काही दिवसांपूर्वी सादर केलेला Nokia 8810 4G फोन इथे लिस्टिंग मध्ये समाविष्ट करण्यात आला नाही.
एक्सेसरीज बद्दल बोलायाचे झाले तर कंपनी ने आपले केस, चार्जर, USB केबल आणि इन-एयर हेडफोंस चा समावेश करण्यात आला आहे. पण यातील कोणत्याही एक्सेसरीज आता खरेदीसाठी उपलब्ध नाहीत.