इंटरनेटवर नोकियाच्या नवीन स्मार्टफोनची अनेक चित्रे समोर आली आहेत. हे फोटो असे सूचित करतायत की, हा एक असा स्मार्टफोन आहे जो पुर्ण मेटलनिर्मित आहे. कदाचित ह्या स्मार्टफोनला ह्याच वर्षी लाँच केले जाईल. आता नोकियाचा मायक्रोसॉफ्ट बरोबर असलेला करारसुद्धा संपत आहे. आणि मग त्यानंतर नोकिया आपला स्वत:चा स्मार्टफोन्स निर्माण करेल.
ह्याआधी नोकियाकडून असे सांगण्यात आले होते की, जसा मायक्रोसॉफ्ट त्याचा करार संपवेल, तसा नोकिया आपला एक आकर्षक स्मार्टफोन बाजारात आणेल. त्याचबरोबर नोकियाचे मुख्य अधिकारी संजीव पूरींनी काही दिवसांपूर्वी असे सांगितले होते की, नोकिया स्मार्टफोन्सच्या जगात परत एकदा दमदार प्रवेश करेल. त्यासाठी त्यांनी अनेकांसोबत भागीदारीही केली आहे. काही कंपन्यांनी फॉक्सकॉनसह भागीदारी करुन आपला N1 टॅबलेट लाँच केला होता.
चला आता नोकियाच्या लीक झालेल्या ह्या फोटोंवर एक नजर टाकूयात.ह्यात एक असा स्मार्टफोन दिसत आहे, जो चारही बाजूंनी काळ्या रंगाचा आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये दोन्ही बाजूंना दोन एँटीना लाइन दिसत आहे. एक ह्या स्मार्टफोनच्या टॉपला आणि एक खालच्या बाजूस. स्मार्टफोनमध्ये आपल्याला वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन उजव्या बाजूस दिले आहे आणि ह्यात मायक्रोएसडी पोर्ट स्मार्टफोनच्या डाव्या बाजूस असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच ह्याच्या फ्रंट पॅनलविषयी बोलायचे झाले तर, येथे आपल्याला एक स्पीकर ग्रील पाहायला मिळेल आणि त्याच्याच खाली नोकियाचा लोगो. कंपनीने ह्या स्मार्टफोनच्या तपशीलाविषयी आणि वैशिष्ट्यांविषयी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. त्याचबरोबर ह्याच्या लाँचविषयीही कोणती माहिती मिळालेली नाही.
हे डिझाईन आपण ह्याआधी पाहिलेल्या नोकिया C1 विषयी आलेल्या बातम्यांमध्ये पाहिलेल्या डिझाईनपेक्षा एकदम वेगळे आहे. नोकियाने ह्या स्मार्टफोनला घेऊन एक व्हिडियोसुद्धा जारी केला आहे, जो आपण येथे पाहू शकता.
C1 विषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनविषयी मागील वर्षी ब-याच अफवा समोर आल्या होत्या. ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची FHD डिस्प्ले. 8MP चा कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला होता. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईडच्या नवीन व्हर्जन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालेल. तसेच असे सांगितले आहे की, नोकियाच्या स्मार्टफोनमध्ये इंटेलच्या चिपसेटसह 2GB ची रॅम असेल.
हेदेखील वाचा- अॅनड्रॉईडसोबत विंडोज १०वरसुद्धा चालणार नोकिया C1 स्मार्टफोन
ह्या स्लाइड शो जरुर पाहा- हे १० अॅप्स तरुण पिढीच्या फोनमध्ये असलेच पाहिजे
हे देखील वाचा- भारतात २८ जानेवारीला लाँच होणार ब्लॅकबेरीचा पहिला अॅनड्रॉईड प्रीव