Nokia चा N-सीरीज मॉडेल 2 मे ला होऊ शकतो लॉन्च

Updated on 27-Apr-2018
HIGHLIGHTS

हे पण संकेत मिळाले आहेत की हा आगामी डिवाइस Nokia N9 (2018) असू शकतो.

एक वर्ष आधी रुमर्स यायला सुरवात झाली होती की Nokia N-सीरीज फोन्स सादर करू शकते आणि आता Weibo वर शेयर केलाला टीजर पाहून संकेत मिळत आहेत की HMD Global जल्द लवकरच Nokia N-सीरीज चा नवीन मॉडेल लॉन्च करू शकते. कंपनी 2 मे ला बीजिंग मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये हा डिवाइस लॉन्च करू शकते. Weibo पोस्ट मध्ये शेयर केलेला फोटो 2011 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Nokia N9 सारखी वाटते जो MeeGo 1.2 Harmattan इंटरफेस देत आहे. या टीजर मधुन हे पण संकेत मिळतात की हा आगामी डिवाइस Nokia N9 (2018) असू शकतो. 
कंपनी आपल्या Nokia X सीरीज चे फोन्स पण रीलॉन्च करण्यासाठी तयार आहे, आज चीन मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये Nokia X6 स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनी Nokia ब्रांड चे जुने डिवाइस रीलॉन्च करत आहे आणि बाजारात प्रत्येक बजेट मध्ये स्मार्टफोन्स सादर करत आहे ज्याने अन्य स्मार्टफोन निर्माता कंपन्यांना टक्कर देता येईल. 
आज लॉन्च होणार्‍या Nokia X6 स्मार्टफोन बद्दल मागील काही दिवसांपासून बातम्या येत आहेत आणि त्यावर विश्वास ठेवल्यास या डिवाइस मध्ये 5.8-इंचाचा 19:9 एस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले असेल आणि हा दोन वेरिएंट्स 4GB रॅम आणि 6GB रॅम मध्ये सादर केला जाईल. त्याचबरोबर डिवाइस च्या बॅक वर डुअल रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे जो Carl Zeiss लेंसेस सह येईल आणि कॅमेरा मध्ये प्रोफेशनल मोड फोटोग्राफी फीचर असेल. 

 
फीचर्ड इमेज काल्पनिक आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :