एप्रिल २०१४मध्येच नोकियाने आपले डिव्हाईस आणि आपल्या सर्व व्यवसायाचे अधिकार मायक्रोसॉफ्ट कंपनीला विकले. परंतु आता क्यु-४च्या माध्यमातून नोकिया मोबाईल व्यवसायात पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. जरी मायक्रोसॉफ्टकडे उत्तम उत्पादन, विपणन आणि वितरण असले तरीही नोकियाला अशा एका भागीदाराची गरज आहे जो त्याची इतक्या मोठ्या अंतराची पोकळी भरुन काढेल. नोकियाने अधिकृतरित्या आपल्याला भागीदाराची गरज असल्याचे विधान केले आहे.
नोेकिया प्रामुख्याने त्याची रचना, पायाभूत सुविधा देणारी एक उत्तम कंपनी म्हणून अस्तित्वात आहे. ही कंपनी तंत्रज्ञानातील प्रगती आणि परवानाबरोबरच ठिकाण आणि नकाशाची सुविधासुद्धा उपलब्ध करुन देते. मागील महिन्यात नोकियाचे सीईओ राजीव सुरी यांनी मायक्रोसॉफ्टबरोबर असलेला करार २०१६च्या मध्यात संपताक्षणीक आपण मोबाईल जगतात कमबॅक करणार असल्याच इशारा दिला. नोकिया एन-१ अॅनड्रॉईड टॅबलेटच्या वेळी त्यांना मिळालेल्या फॉक्सकॉनसारख्या भागीदाराच्या शोधात आहे.
ब्रँड लायसनिंग मॉडेल हा मोबाईल फोनच्या क्षेत्रात परतण्यासाठी एक योग्य मार्ग असल्याचे नोकियाचे म्हणणे आहे. हयाचाच अर्थ असा नोकिया असा भागीदार शोधत आहे जो उत्पादन, विक्री , विपणन आणि ग्राहकांचे समर्थन करण्याची जबाबदारी पेलू शकेल. ”जर आम्हाला हया सर्व जबाबदारी पेलणारा जगातील सर्वाेत्कृष्ट असा भागीदार मिळाला तर आम्ही जसे नोकिया एन-१ अॅनड्रॉईड टॅबलेटच्या वेळेस केले होते तसेच ह्या भागीदारालाही हया फोनचे डिझाईन्स आणि तंत्रज्ञानाविषयी सल्ला देण्याची संधी देऊ.” मायक्रोसॉफ्टने नोकियासाठी जे ७.२ अब्ज डॉलर खर्च केले होते ते हल्लीच नोकियाने तोडले आहे. नोकिया आधीच आपले माजी मुख्य सचिव स्टीफन इलोप यांना गमावून बसला आहे, जे नोकिया सोडून मायक्रोसॉफ्ट कंपनीत दाखल झाले. लुमिया स्मार्टफोनमुळे झालेल्या नुकसानापायी त्यांनी ७८०० लोकांना कामावरुन कमी केले.त्यात भर म्हणून मायक्रोसॉफ्टने ठरलेल्या ठरावापेक्षा जास्त अशी ७.६ अब्ज डॉलर असा ठराव केल्याचे लेखी दिले आहे.