Nokiaची पुन्हा जबरदस्त एंट्री! Nokia G80 5G लवकरच होणार लाँच, मिळतील उत्कृष्ट फीचर्स
Nokia G80 5G लवकरच होणार लाँच
Nokia Apollo अलीकडेच FCC सर्टिफिकेशनमध्ये दिसला
Nokia G80 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक
2022 मध्ये NOKIA मोबाईल द्वारे अनेक Nokia X आणि G सीरीज 5G स्मार्टफोन लाँच केले जातील, अशी बातमी आली होती. त्यातच आता, Nokia X30 5G आणि Nokia G80 5G लीक झाले आहेत, जे त्यांचे अस्तित्व आणि लॉन्चिंग कन्फर्म करतात.
हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy Buds 2 Pro आकर्षक डिझाइनसह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Nokia G80 5G लवकरच बाजारात येणार
लीक व्यतिरिक्त Nokia G80 5G म्हणजेच Nokia Apollo अलीकडेच FCC सर्टिफिकेशनमध्ये समोर आला आहे. FCC प्रमाणपत्राने TA-1479, TA-1481, TA-1490, TA-1475 ची Nokia G80 5G चे व्हेरिएंट म्हणून पुष्टी केली आहे.
Nokia G80 5G चे स्पेसिफिकेशन्स
FCC सर्टिफिकेशनमधील लेबलने सूचित केल्याप्रमाणे, Nokia G80 5G मध्ये मागील बाजूस ट्रिपल-कॅमेरा मॉड्यूल असू शकतो. हे Nokia G21 वर वापरलेले एक नवीन कॅमेरा मॉड्यूल असू शकते. TA-1490 आणि TA-1475 हे सिंगल-सिम व्हेरिएंट आहेत, तर TA-1479 आणि TA-1481 हे ड्युअल-सिम व्हेरिएंट आहेत, हे देखील उघड झाले आहे.
Nokia G80 5G मध्ये 4500mAh बॅटरी असेल. Nokia Mobiles मधील अनेक आगामी 5G स्मार्टफोन Snapdragon 480 Plus 5G प्रोसेसरद्वारे समर्थित असू शकतात. खरं तर, HMD ग्लोबलने प्रेस रीलिझमध्ये त्याच्या भविष्यातील स्मार्टफोनसाठी क्वालकॉमचा विचार असल्याचे आधीच सूचित केले आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile