digit zero1 awards

प्रतीक्षा संपली! 50MP कॅमेरासह Nokia G42 अखेर भारतात लाँच, अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे किंमत

प्रतीक्षा संपली! 50MP कॅमेरासह Nokia G42 अखेर भारतात लाँच, अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे किंमत
HIGHLIGHTS

HMD ग्लोबलने आज भारतात Nokia G42 5G स्मार्टफोन लाँच केला आहे.

Nokia G42 5G स्मार्टफोन भारतात 12,599 च्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.

15 सप्टेंबरपासून ग्राहक हा स्मार्टफोन Amazon.in वरून ऑनलाइन खरेदी करू शकतात.

Nokia च्या लेटेस्ट स्मार्टफोनबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता अखेर Nokia ब्रँडेड स्मार्टफोन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी HMD ग्लोबलने आज भारतात Nokia G42 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या उपकरणाची विशेषता म्हणजे फोन 2-पीस युनिबॉडी डिझाइनसह डिझाइन केलेले आहे.  तर, या फोनचा मागील पॅनल 65% रीसायकल प्लास्टिकपासून बनलेला आहे. त्याबरोबरच, हा बजेट फोन 20W फास्ट चार्जर, केबल आणि बॉक्समध्ये जेली केससह येईल. 

Nokia G42 5G ची भारतीय किंमत आणि उपलब्धता

nokia g42 5g

Nokia G42 5G स्मार्टफोन भारतात 12,599 च्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. 15 सप्टेंबरपासून ग्राहक हा स्मार्टफोन Amazon.in वरून ऑनलाइन खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन So Purple आणि So Grey या दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Nokia G42 5G

  Nokia G42 5G च्या स्पेसीफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 6.56-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, जो 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. ही स्क्रीन कॉर्निंग गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येईल. Nokia G42 5G हा एक ड्युअल सिम स्मार्टफोन आहे जो Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. त्याबरोबरच, कंपनीने पुष्टी केली आहे की, फोनला 2 वर्षांचे OS अपडेट्स आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी पॅच मिळतील.

nokia g42 5g

हा हँडसेट ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेटसह सुसज्ज आहे. Snapdragon 480 Plus हे फ्री फायर आणि PUBG MOBILE सारखे गेम उच्च FPS वर हाताळण्यासाठी पुरेसे फास्ट आहे. जो 6GB रॅम आणि 5GB अतिरिक्त आभासी रॅमसह समर्थित आहे. याशिवाय, हा फोन 128GB इनबिल्ट स्टोरेज ऑफर करतो जो मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येतो.

 जर आपण कॅमेराबद्दल बोललो तर, Nokia G42 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्रायमरी सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असणार आहे. याशिवाय, सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा देखील असेल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील असणार आहे, जी 20W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे. ही बॅटरी बेसिक कामांसह दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवते.  

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo