Nokia G42 5G नवीन स्मार्टफोन HMD Global ने आपला पहिला रिपेयरेबल 5G स्मार्टफोन म्हणून लाँच केला आहे. कंपनीचा हा एक अप्रतिम स्मार्टफोन आहे, ज्याचा प्रत्येक पार्ट युजर स्वतः रिपेयर करण्यास सक्षम असणार आहेत. खरं तर, Nokia G42 5G 'क्विकफिक्स रिपेयरीबिलिटी' फीचरने सुसज्ज आहे, ज्यासाठी HMD Global ने iFixit सह भागीदारी केली आहे.
दरम्यान, फोनची स्क्रीन रिपेयर करण्यापासून ते चार्जिंग पोर्ट बदलण्यासाठी तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. कंपनी यासह फोन रिपेयर करण्यासाठी गाईड देणार आहे. यापूर्वी कंपनीने रिपेरेबिलिटी फीचरसह Nokia G22 4G स्मार्टफोन लाँच केला आहे.
Nokia च्या या फोनमध्ये 6.56-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइन उपलब्ध असेल. डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट मिळणार आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आला आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 480 Plus 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज ऑप्शनसह येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनची रॅम आणि इंटरनल स्टोरेज वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर असा ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 20W फास्ट चार्जिंग मिळणार आहे.
Nokia G42 5G स्मार्टफोन 4GB RAM + 128GB आणि 6GB RAM + 128GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे युरो 229 म्हणजेच अंदाजे 20,466 रुपये आणि युरो 249 म्हणजेच अंदाजे 22,456 रुपये आहे. हा नोकिया फोन भारतात लाँच होईल की नाही, याबाबत कंपनीने अद्याप पुष्टी केलेली नाही.