Nokia चा ‘हा’ 5G फोन आता 16GB रॅमसह भारतात लाँच, ब्लूटूथ हेडफोन्स मिळणार Free! बघा किंमत | Tech News 

Nokia चा ‘हा’ 5G फोन आता 16GB रॅमसह भारतात लाँच, ब्लूटूथ हेडफोन्स मिळणार Free! बघा किंमत | Tech News 
HIGHLIGHTS

आज कंपनीने या फोनचा एक नवीन 8GB रॅम व्हेरिएंट भारतात सादर केला.

6GB रॅम + 128GB स्टोरेज म्हणजेच बेस व्हेरिएंटची लॉन्च किंमत 12,599 रुपये

फोनमध्ये 50MP चा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे.

Nokia ने काही दिवसांपूर्वीच भारतात आपला बजेट रेंज 5G फोन Nokia G42 5G लाँच केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, 6GB रॅमसह येणारा हा स्मार्टफोन 12,599 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. आज कंपनीने या फोनचा एक नवीन 8GB रॅम व्हेरिएंट भारतात सादर केला आहे. एवढेच नाही तर, याबरोबर 8GB व्हर्च्युअल रॅम देखील मिळेल. चला तर मग Nokia G42 5G ची किंमत, तपशील आणि उपलब्धता बघुयात.

हे सुद्धा वाचा: OnePlus Open ची इंडिया लाँच अखेर कन्फर्म, पोस्टरमध्ये बघा Attractive डिझाईनची पहिली झलक। Tech News

Nokia G42 5G ची किंमत

Nokia G42 5G फोन भारतीय बाजारात आता दोन मेमरी व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. 6GB रॅम + 128GB स्टोरेज म्हणजेच बेस व्हेरिएंटची लॉन्च किंमत 12,599 रुपये होती. मात्र, सध्या हा स्मार्टफोन Amazon सेलमध्ये 11,999 रुपयांना उपलब्ध आहे. त्याबरोबरच, नवीन 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 16,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Nokia G42 5G Price amazon Discount
NOKIA G42 5G

लक्षात घ्या की, Nokia G42 5G फोन 8GB रॅम व्हेरिएंट 18 ऑक्टोबरपासून खरेदी केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे यासह 999 रुपये किमतीचे ब्लूटूथ हेडफोन देखील त्याच्यासोबत मोफत उपलब्ध आहेत. Nokia G42 5G ग्रे, पर्पल आणि पिंक कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Nokia G42 5G

Nokia G42 5G फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याबरोबरच, फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. Nokia G42 5G मध्ये ड्युअल सिम 5G आणि 4G तसेच साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, OZO प्लेबॅक ऑडिओ, Wi-Fi आणि ब्लूटूथ सारखे पर्याय आहेत.

फोटोग्राफीसाठी, Nokia G42 5G ट्रिपल रिअर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी सेन्सर 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. फ्रंट पॅनलवर 8MP चा सेल्फी सेन्सर देखील देण्यात आला आहे. तसेच, या फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo