Nokia G42 5G: 50MP कॅमेरासह येणाऱ्या फोनचा स्वस्त व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत फक्त 9,999 रुपये। Tech News 

 Nokia G42 5G: 50MP कॅमेरासह येणाऱ्या फोनचा स्वस्त व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत फक्त 9,999 रुपये। Tech News 
HIGHLIGHTS

Nokia G42 5G फोनच्या 4GB रॅम व्हेरिएंटची घोषणा

कंपनीने हा फोन 9,999 रुपये किमतीत लाँच केला आहे.

या फोनची विक्री भारतात 8 मार्चपासून Amazon द्वारे सुरू होणार आहे.

Nokia ने आपला स्वस्त फोन Nokia G42 5G गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये भारतात लाँच केला होता. लाँचच्या वेळी हा फोन 8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला गेला होता. त्यानंतर, आता कंपनीने या 5G फोनच्या 4GB रॅम व्हेरिएंटची घोषणा देखील केली आहे. जाणून घेऊयात Nokia G42 5G फोनच्या नव्या व्हेरिएंटची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल संपूर्ण माहिती-

हे सुद्धा वाचा: Samsung च्या फ्लॅगशिप 5G स्मार्टफोनवर होतोय Discount ऑफर्सचा वर्षाव, अगदी निम्म्या किमतीत खरेदी करा फोन। Tech News

Nokia G42 5G 4GB RAM variant launched
Nokia G42 5G 4GB RAM variant launched

Nokia G42 5G 4GB रॅम व्हेरिएंटची किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, Nokia G42 5G चा नवीन 4GB RAM व्हेरिएंट आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. कंपनीने हा फोन 9,999 रुपये किमतीत लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा भारतीय बाजारपेठेतील सर्वात परवडणारा 5G फोन आहे. नवीन व्हेरियंट सो पर्पल आणि सो ग्रे कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. उप्लब्धतेबद्द बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री भारतात 8 मार्चपासून Amazon द्वारे सुरू होणार आहे.

Nokia G42 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nokia G42 5G फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. ही स्क्रीन LCD पॅनेलवर बनवण्यात आली आहे, जी 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनमध्ये ड्युअल सिम 5G आणि 4G तसेच सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia G42 5G ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यामध्ये 50MP चा प्राथमिक सेन्सर, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. त्याबरोबरच, फ्रंट पॅनलवर 8MP सेल्फी सेन्सर आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 5,000 mAh बॅटरीने सुसज्ज आहे. बॅटरीसह तुम्हाला 20W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानही देण्यात आले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo