digit zero1 awards

पहिल्या सेलमध्ये Nokia G42 5G चा होतोय प्रचंड खप, मिळतोय हजारोंचा डिस्काउंट, तुम्हीही बघा ऑफर!

पहिल्या सेलमध्ये Nokia G42 5G चा होतोय प्रचंड खप, मिळतोय हजारोंचा डिस्काउंट, तुम्हीही बघा ऑफर!
HIGHLIGHTS

Nokia G42 5G ची सेल आजपासून भारतात सुरु झाली आहे.

नव्या बजेट स्मार्टफोनची किमंत 12,599 रुपये इतकी आहे.

सेल दरम्यान तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच Nokia G42 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. Nokia ने हा फोन बजेट विभागात सादर केला आहे. हा Nokia फोन Snapdragon 480+ Processor वर चालतो, फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देखील आहे. याशिवाय नोकिया फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. आज हा फोन Amazon India द्वारे विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. 

Nokia G42 5G वर उपलब्ध ऑफर्स 

फोनची सेल 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12:00 वाजतापासून सुरु झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलमध्ये 12,599 रुपयांच्या लाँच किंमतीवर खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नोकिया G42 स्मार्टफोनवर सेल दरम्यान तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज देखील मिळणार आहे. म्हणजेच नोकियाचा हा फोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. म्हणजेच या ऑफर अंतर्गत तुम्ही Nokia G42 5G वर एक्सचेंज ऑफरमध्ये हजारो रुपयांची सूट मिळवू शकता.

nokia g42 5g

Nokia G42 5G 

Nokia G42 5G स्मार्टफोनमध्ये 6.56-इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. वर सांगितल्याप्रमाणे, फोनमध्ये Snapdragon 480+ Processor आहे, Snapdragon 480 Plus हे फ्री फायर आणि PUBG MOBILE सारखे गेम उच्च FPS वर हाताळण्यासाठी पुरेसे जलद आहे. फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. या फोनमध्ये तुम्हाला व्हर्चुअल रॅम सपोर्ट देखील मिळतो, जो सुमारे 11GB पर्यंत आहे.

Nokia G42 5G स्मार्टफोन Android 13 वर लाँच करण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये दोन वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपग्रेड आणि 3 वर्षांसाठी मंथली सिक्योरिटी अपडेट मिळतील. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील आहे, जी 20W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Nokia G42 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि दोन 2MP सेन्सर देखील आहेत. 50MP प्रायमरी कॅमेरासह शार्प इमेजेस कॅप्चर करता येतील. आकर्षक सेल्फीसाठी या फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo