digit zero1 awards

Nokia G42 5G India Launch: User-Repairable सुविधेसह आगामी स्मार्टफोन Amazon वर सूचिबद्ध, वाचा डिटेल्स

Nokia G42 5G India Launch: User-Repairable सुविधेसह आगामी स्मार्टफोन Amazon वर सूचिबद्ध, वाचा डिटेल्स
HIGHLIGHTS

Nokia 6 सप्टेंबर रोजी भारतात नवीनतम 5G स्मार्टफोन आणणार आहे.

Nokia G42 5G फोन Amazon इंडिया साइटवर सर्व फीचर्ससह लिस्ट करण्यात आला आहे.

Nokia चा हा पहिला 5G स्मार्टफोन आहे, जो 'User-Repairable' फीचरसह आला आहे.

Nokia ने अलीकडेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली होती की, कंपनी भारतात एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी 6 सप्टेंबर रोजी भारतात नवीनतम 5G स्मार्टफोन आणणार आहे, अशी माहिती देण्यात आली होती. सध्या कंपनीने आगामी स्मार्टफोनचे नाव पडद्याआड ठेवलेले असेल तरी, असे मानले जात आहे की हा 'Nokia G42 5G' स्मार्टफोन असू शकतो. हा फोन जून महिन्यात जागतिक बाजारपेठेत दाखल झाला आहे, तर आता भारतातही लाँचसाठी सज्ज झाला आहे.

 खरं तर, Nokia G42 5G फोन Amazon इंडिया साइटवर सर्व फीचर्ससह लिस्ट करण्यात आला आहे, जो त्याच्या भारतातील लाँचची पुष्टी करतो. विशेष म्हणजे जागतिक बाजारपेठेतील Nokia चा हा पहिला 5G स्मार्टफोन आहे, जो 'User-Repairable' फीचरसह आला आहे. अशा स्थितीत भारतातही हा फोन या सुविधेसह दाखल होण्याची शक्यता आहे. सविस्तर माहिती बघुयात. 

nokia g42 5g

Nokia G42 5G चे तपशील 

Amazon लिस्टिंगनुसार लाँचपूर्वी फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. कंपनी या फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देईल, ज्याचा 90Hz रिफ्रेश रेट असेल. याशिवाय, हा फोन Qualcomm Snapdragon 480+ प्रोसेसरने सुसज्ज असेल. या लाइनअपमधील हा सर्वात वेगवान GPU आहे. Snapdragon 480 Plus हे फ्री फायर आणि PUBG MOBILE सारखे गेम उच्च FPS वर हाताळण्यासाठी पुरेसे जलद आहे. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिले जाऊ शकते. फोनमध्ये 5GB व्हर्चुअल रॅमचा पर्यायही उपलब्ध असेल.

फोटोग्राफीसाठी नोकियाच्या फोनमध्ये 50MP कॅमेरा, 2MP मॅक्रो सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सरचा समावेश असेल. पिक्सेलची जास्त संख्या म्हणजे कॅमेरा अधिक माहिती कॅप्चर करण्यास सक्षम आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. जर तुम्ही सेल्फीचे शौकीन असाल तर हा सेल्फी कॅमेरा तुमच्यासाठी बेस्ट आहे. फोनची बॅटरी 5000mAh असेल, ज्यामध्ये 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. ही बॅटरी काही मूलभूत कार्यांसह दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवते. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo