Nokia ने भारतीय बाजारात Nokia G11 Plus नावाने एक नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले मिळत आहे. इतकेच नाही तर या फोनमध्ये तुम्हाला डिस्प्लेवर 90Hz रिफ्रेश रेट मिळेल. याशिवाय हा फोन ब्लोटवेअर स्टॉक अँड्रॉइड 12 साठी सपोर्ट करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…
हे सुद्धा वाचा : भारीच की ! 5G फोन खरेदी करण्याची उत्तम संधी, Xiaomi देत आहे 10,400 रुपयांपर्यंत सूट
नोकिया G11 प्लस स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटसह येतो, ज्याची किंमत फक्त 12,499 रुपये आहे. हा फोन चारकोल ग्रे आणि लेक ब्लू कलरमध्ये खरेदी करता येईल. नोकियाचे म्हणणे आहे की, हे उपकरण लवकरच रिटेल आणि ऑनलाइन माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल.
या फोनमध्ये तुम्हाला 6.5-इंच लांबी चा HD+ डिस्प्ले मिळत आहे. याशिवाय तुम्हाला फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट मिळत आहे, फोनचा डिस्प्ले 20:9 आस्पेक्ट रेशो सह येतो. याशिवाय तुम्हाला फोनमध्ये Unisoc T606 प्रोसेसर मिळत आहे, एवढेच नाही तर फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळत आहे. या फोनमध्ये तुम्हाला मायक्रो SD कार्ड सपोर्ट मिळत आहे. म्हणजेच जर तुम्हाला फोनमधील स्टोरेज वाढवायचे असेल तर तुम्हाला ते सहज वाढवता येईल.
त्याबरोबरच, तुम्हाला फोन मध्ये डुअल कॅमेरा सेटअप मिळत असल्याची माहिती मिळत आहे. या फोनमध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा मिळत आहे, जो ऑटोफोकस सह येतो. याशिवाय, तुम्हाला फोनमध्ये 2MP डेप्थ कॅमेरासुद्धा मिळत आहे. आकर्षक सेल्फीसाठी तुम्हाला फोनमध्ये 8MP फिक्स्ड फोकस कॅमेरा मिळेल.
याशिवाय, फोनमध्ये तुम्हाला Nokia G11 Plus स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळत आहे. ही बॅटरी जवळपास 3 दिवस चालण्यास सक्षम आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. तुम्हाला या बॅटरीसोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत नसला तरी फोनमध्ये तुम्हाला 10W चा नियमित चार्जर मिळत आहे.