नोकिया पुन्हा एकदा आपल्या फोन्स, स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्सच्या जगात धमाकेदार एन्ट्री करण्यास सज्ज झाला आहे.
जगातील सर्वात मोठी मोबाईल निर्माता कंपनी नोकिया पुन्हा एकदा बाजारात धमाकेदार एन्ट्री करण्यास सज्ज झाला आहे. नोकियाने घोषणा केली आहे की, तो पुन्हा एकदा आपल्या फोन्स, स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्सच्या जगात धमाकेदार एन्ट्री करणार आहे. कंपनीनुसार, कंपनी आता अॅनड्रॉईड स्मार्टफोन आणि टॅबलेट्स लाँच करेल.
नोकियाने पुढील १० वर्षांसाठी HMD ग्लोबलसह नोकिया ब्रँडेड फोन बनविण्यासाठी भागीदारी केली आहे. नोकिया स्मार्टफोन्स विक्रीसाठी HMD कंपनीकडून रॉयल्टी पेमेंट दिले जाईल. नोकिया बाजारात उतरण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
नोकियाने आपल्या अधिकृत ब्लॉॅगवर लिहिले आहे की, “नोकिया न्यू जेनरेशन स्मार्टफोन्स आणि टॅबलेट आणण्यासाठी HMD ग्लोबलशी स्ट्रॅटीजिक ब्रँड आणि इंटलेक्चुअल प्रोपर्टी लायसेंसचा करार करत आहे.” कंपनीने पुढे असेही सांगितले आहे की, नोकिया HMD ग्लोबलचा हिस्सा नसेल आणि ह्याचे फीचर फोन, स्मार्टफोन्स आणि टॅबलेट “नोकिया” ब्रँडनेच बाजारात उपलब्ध होतील.
HMD ग्लोबल फिनलँडची कंपनी आहे, ज्याचे सीईओ ऐर्टो न्यूमेला नोकियामध्ये मोठ्या पदावर होते. ह्या कंपनीने मायक्रोसॉफ्टकडून नोकियाचा फीचर फोन डिपार्टमेंट खरेदी केला आहे. HMD ग्लोबलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये नोकियाकडून एक डायरेक्टर असेल.