60 वर्षांत प्रथमच Nokia ब्रँड ओळख बदलणार, बघा कसा असेल नवीन लोगो…

60 वर्षांत प्रथमच Nokia ब्रँड ओळख बदलणार, बघा कसा असेल नवीन लोगो…
HIGHLIGHTS

Nokia ब्रँड अखेर स्वतःची ओळख बदलणार

60 वर्षात प्रथमच ओळख बदलण्याची घोषणा

Nokia चा नवीन लोगो बघा

दूरसंचार उपकरणे आणि स्मार्टफोन निर्माता Nokiaने जवळपास 60 वर्षांत प्रथमच आपल्या ब्रँड ओळखीत बदल करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनी नवीन लोगो सादर करणार आहे. यात नोकिया हा शब्द तयार करणारे पाच वेगवेगळे आकार असतील. मात्र, नवीन लोगोमध्ये अनेक दशकांपासून कंपनीच्या लोगोचा भाग असलेला निळा रंग दिसणार नाही. बघा नवीन लोगो… 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Infinix Smart 7 वर प्रचंड सवलत, जाणून घ्या किमंत आणि फीचर्स

Nokia चे चीफ एक्झिक्युटिव्ह Pekka Lundmark यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "याआधी स्मार्टफोन्समध्ये अधिक व्यस्तता होती आणि आजकाल आम्ही एक व्यवसाय तंत्रज्ञान कंपनी आहोत." स्पेनमधील बार्सिलोना येथे सोमवारपासून सुरू झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस MWC आधी ते कंपनीच्या व्यवसायाची माहिती देत ​​होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी अडचणीत आलेल्या नोकियाची कमान हाती घेतल्यानंतर त्यांनी व्यवसायासाठी त्रिसूत्री योजना बनवली. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार असल्याचे Pekka यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, "गेल्या वर्षी आमच्या एंटरप्राइझ सेगमेंटमध्ये 21 टक्के वाढ झाली होती. आमच्या विक्रीत त्याचा वाटा सुमारे आठ टक्के आहे. आम्हाला ते लवकरात लवकर दुहेरी अंकात आणायचे आहे,". अनेक तंत्रज्ञान कंपन्या ऑटोमेटेड कारखान्यांना उपकरणे विकण्यासाठी नोकियासारख्या दूरसंचार उपकरण निर्मात्यांसोबत भागीदारी करत आहेत. 

कंपनीने आपला सर्व्हिस प्रोव्हाइडर बिजनेस वाढवण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये ती टेलिकॉम कंपन्यांना उपकरणे विकते. मात्र, कंपनीचे लक्ष इतर क्षेत्रांना उपकरणे विकण्यावर आहे. 

यासह, नोकिया Amazon आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या टेक कंपन्यांशी थेट स्पर्धा करेल. "विविध परिस्थिती असतील. काहींमध्ये ते आमचे भागीदार असतील, काहींमध्ये ते आमचे ग्राहक असतील आणि अशा परिस्थिती असतील ज्यामध्ये ते आमचे प्रतिस्पर्धी असतील," असे देखील पेक्का यांनी स्पष्ट केले. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo