प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताचा Nokia C32 स्मार्टफोन मे 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता. आता लाँच झाल्यानंतर जवळपास 1 वर्षानंतर HMD ग्लोबल कंपनीने आता या फोनची किंमत कमी केली आहे. फोनच्या विशेष वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Nokia C32 फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 50MP प्रायमरी रियर कॅमेरा आहे. तसेच, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनची नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित सर्व तपशील.
हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy S23 FE वर मिळतोय तब्बल 10,000 रुपयांचा थेट Discount, बघा Best ऑफर
कंपनीने Nokia C32 स्मार्टफोन 8,999 रुपये किमतीत लाँच करण्यात आला होता. ही किंमत फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. मात्र, आता या फोनच्या किमतीत 1500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. यासह, हा फोन आता 7,499 रुपयांना खरेदी करता येईल. याबरोबरच, फोनची नवीन किंमत कंपनीच्या साइटवर लाईव्ह करण्यात आली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, NOKIA चा हा फोन तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला गेला आहे. यामध्ये क्रोकोल, ब्रीझी मिंट आणि बीच पिंक हे कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
Nokia C32 फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी ऑक्टा-कोर प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB आणि 128GB स्टोरेज ऑप्शन्स मिळणार आहेत. हा फोन Android 13 वर कार्य करतो. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. हा फोन एका चार्जवर 3 दिवसांपर्यंत बॅटरी देतो, असा कंपनीचा दावा आहे.