Nokia C32 उद्या भारतात होणार दाखल, किमंत असेल 10 हजार रुपयांपेक्षा कमी

Updated on 22-May-2023
HIGHLIGHTS

Nokia C32 भारतात 23 मे रोजी लाँच होणार

भारतात फोनची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये असण्याची शक्यता

हा फोन 3 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ ऑफर करू शकतो.

Nokia C32 लवकरच म्हणजे उद्या 23 मे 2023 रोजी भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. हे मॉडेल फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावर सादर करण्यात आले होते. विशेष म्हणजे हा हँडसेट एका वर्षाच्या रिप्लेसमेंट ऑफरसह भारतात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Nokia C32 ची अपेक्षित किंमत

 Nokia C32 भारतात 23 मे रोजी लाँच होऊ शकतो. भारतात फोनची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये असण्याची शक्यता आहे. याशिवाय, हा फोन 3GB / 4GB RAM आणि 64GB / 128GB इन-बिल्ट स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येईल. आगामी स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाऊ शकतो. 

Nokia C32 चे संभावित फीचर्स आणि स्पेक्स

Nokia C32 मध्ये 6.5-इंच लांबीचा IPS HD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. डिव्हाइस Unisoc SC9863A चिपसेटद्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. तर, Android 13 सह येऊ शकतो. हा फोन ड्युअल सिमला सपोर्ट करेल. स्मार्टफोन 5,000mAh बॅटरी असेल, जी 3 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ ऑफर करेल असे म्हटले जाते.

उत्तम फोटोग्राफीसाठी Nokia C32 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा युनिट असण्याची अपेक्षा आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये LED फ्लॅशसह 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेन्सर असण्याची अपेक्षा आहे. तर डिस्प्लेच्या वरील भागावर फ्रंट 8MP सेल्फी सेन्सर असणार आहे. 

टीप : ही एक काल्पनिक इमेज आहे.  

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :