Nokia चा ‘हा’ मस्त फोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच, किंमत आहे खूपच कमी

Nokia चा ‘हा’ मस्त फोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच, किंमत आहे खूपच कमी
HIGHLIGHTS

Nokia C31 हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच

या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये तुम्हाला वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉच मिळेल.

या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये

हँडसेट मेकर Nokia ने आपल्या C सीरीज अंतर्गत Nokia C31 हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. या एंट्री-लेव्हल स्मार्टफोनमध्ये कंपनीने HD प्लस रिझोल्यूशन डिस्प्लेसह 5050 mAh ची मजबूत बॅटरी दिली आहे. नोकियाच्या या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये तुम्हाला वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉच मिळेल, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा आहे. 

हे सुद्धा वाचा : उज्जैनच्या श्री महाकाल महालोक आणि महाकालेश्वर मंदिरात JIO ट्रू 5G सेवा सुरू

किंमत : 

या नोकिया मोबाईल फोनचे दोन व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत. 3 GB रॅमसह 32 GB स्टोरेज आणि 4 GB  रॅमसह 64 GB स्टोरेज. या मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 9,999 रुपये आणि 10,999 रुपये आहे. फोन मिंट, चारकोल आणि सायन या तीन कलर व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत.

Nokia C31 चे स्पेसिफिकेशन्स 

नोकियाच्या या फोनमध्ये 6.7-इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे, जो 1200*720 पिक्सेल रिझोल्यूशन देतो. हा हँडसेट 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 60 Hz रिफ्रेश रेटसह लॉन्च करण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Nokia C31 मध्ये कोणता ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे, सध्या याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. Nokia C31 मध्ये 4 GB RAM सह 64 GB इंटरनल स्टोरेज आहे, आम्ही तुम्हाला सांगतो की मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 256 GB पर्यंत वाढवणे शक्य आहे.

नोकिया C सीरीज अंतर्गत लॉन्च केलेल्या या बजेट स्मार्टफोनमध्ये फोनमध्ये 5050 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 10 W स्टँडर्ड चार्जला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यात मायक्रो- USB 2.0 चार्जिंग पोर्ट, ब्लूटूथ व्हर्जन 4.2, 3.5 मिमी हेडफोन जॅक, जीपीएस, ए-जीपीएस, Wi-Fi यांसारखी अनेक फीचर्स फोनमध्ये उपलब्ध असतील.

फोनच्या मागील पॅनलवर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सरसह तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी कॅमेरा फोनच्या फ्रंटला वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉचमध्ये आहे. या डिव्‍हाइसमध्‍ये तुम्‍हाला HDR मोड, पोर्ट्रेट मोड, नाईट मोड आणि स्‍टोरेज स्‍मार्ट यांसारखी कॅमेरा फिचर्स पाहायला मिळतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo