Nokia C12 आज प्रथमच खरेदी करण्याची संधी, प्रत्येकाच्या बजेटमध्ये येईल किंमत
Nokia C12 ची भारतात विक्री सुरु
लॉन्चिंग ऑफरअंतर्गत किंमत 5,999 रुपये
त्वरा करा ! ही किंमत केवळ आजसाठी आहे.
HMD Global ने गेल्या आठवड्यातच भारतात Nokia C12 लॉन्च केला आहे. Nokia C12 हा ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि चांगल्या डिझाइनसह एंट्री-लेव्हल फोन आहे. Nokia C12 आता Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. लॉन्चिंग ऑफर अंतर्गत, नोकिया C12 स्वस्तात खरेदी करण्याची संधी देखील मिळेल. चला जाणून घेऊया Nokia C12 ची किंमत आणि सर्व फीचर्स
हे सुद्धा वाचा : Oppo Find N2 Flip ची भारतात सेल सुरु, मिळतोय तब्बल 10 हजारांचा डिस्काउंट
Nokia C12 ची किंमत
Nokia C12 चा सेल आजपासून Amazon India वर सुरु झाली आहे. Nokia C12 च्या 2 GB RAM सह 64 GB स्टोरेजची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किमतीत हा फोन फक्त 17 मार्चपर्यंत म्हणजेच आजची लॉन्चिंग किंमत आहे. हा फोन डार्क शिऑन आणि लाइट मिंट कलरमध्ये खरेदी करता येईल.
Nokia C12 चे स्पेसिफिकेशन
Nokia C12 मध्ये 6.3-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. या Nokia फोनमध्ये AndroidTM 12 (Go Edition) आहे, जो 20 टक्के अधिक मोफत स्टोरेजचा दावा करतो. यासोबतच 2 GB व्हर्चुअल रॅम देखील उपलब्ध आहे. नोकियाच्या या फोनमध्ये Unisoc 9863A1 ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.
Nokia C12 मध्ये 8 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. Nokia C12 च्या कॅमेरासोबत पोर्ट्रेट आणि विशेषत: नाईट मोड देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ब्लूटूथ 5.2, 3.5mm हेडफोन जॅक, मायक्रो USB, WiFi: 802.11 b/g/n, वायरलेस रेडिओ आणि वायर रेडिओ दोन्ही आहेत. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी आहे, जी रिमूव्हेबल आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile