Nokiaने या वर्षी मार्चमध्ये Nokia C12 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला होता. मात्र, हा फोन आता नव्या रंग रूपात सादर करण्यात आला आहे. पूर्वी हा फोन तीन रंगात खरेदीसाठी उपलब्ध होता. Nokia C12 Pro आतापर्यंत लाइट मिंट, चारकोल आणि डार्क सायन कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, मात्र, आता कंपनीने हा फोन 'पर्पल' या नव्या रंगात सादर केला आहे. एवढेच नाही तर फोनमध्ये अजून बरेच नवीन मिळणार आहे.
हा फोन तीन रॅम प्रकारांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये 2GB रॅम, 3GB रॅम आणि 4GB रॅम देण्यात आली आहे. फोनची किंमत अनुक्रमे 6,999 आणि 7,499 रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे समर स्पेशल ऑफरमध्ये फोनवर 150 रुपयांची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध आहे.
https://twitter.com/NokiamobileIN/status/1672854729070874627?ref_src=twsrc%5Etfw
Nokia C12 Pro मध्ये 6.3 इंच लांबीचा HD + डिस्प्ले आहे. फोन Android 12 'Go' एडिशनवर लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये 1.6GHz क्लॉक स्पीडसह Unisoc 9863A1 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. नोकियाच्या या फोनमध्ये 3.5mm जॅक, वायरलेस एफएम रेडिओ, फेस अनलॉक, मायक्रो यूएसबी, ब्लूटूथ 5.2 आणि वायफाय इ. फीचर्स उपलब्ध आहेत.
फोनमध्ये फोटोग्राफीसाठी सिंगल रियर आणि सिंगल फ्रंट कॅमेरा आहे. फोनच्या मागील पॅनलवर फ्लॅशलाइटसह 8-मेगापिक्सलचा सेन्सर आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 5-मेगापिक्सलची लेन्स आहे. हा फोन पॉवर बॅकअपसाठी 4,000mAh बॅटरीच्या समर्थनासह आहे. ही एक रिमूव्हेबल बॅटरी आहे.