बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध असलेल्या NOKIA कंपनीने आणखी एक बजेट स्मार्टफोन बाजारात दाखल केला आहे. या नव्या स्मार्टफोनचे नाव NOKIA C12 PLUS असे आहे. NOKIA C सिरीज अंतर्गत लाँच होणार हा या वर्षीचा तिसरा स्मार्टफोन आहे. यापूर्वी NOKIA C12 आणि NOKIA C12 PRO लाँच करण्यात आले आहेत.
चला तर जाणून घेऊयात नव्या फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
NOKIA C12 PLUS चा सिंगल व्हेरिएंट बाजारात लाँच करण्यात आला आहे. जो 2GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. कंपनीने या व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. या फोनची स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येते.
NOKIA C12 PLUSमध्ये 60 Hzच्या रिफ्रेश रेटसह 6.3 इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो 720×1512 HD+ रिझोल्युशन ऑफर करतो. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी या फोनमध्ये Unisock SC9863A1 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा चिपसेट एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये येतो.
या व्यतिरिक्त, फोनमध्ये 4000mAhची बॅटरी देण्यात आली आहे, जी microSD 2.0 पोर्टद्वारे 10W चार्ज करण्यास सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी, फोनच्या बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह 8MPचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, आकर्षक सेल्फीसाठी फोनच्या समोरील बाजूस 5MPचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
सिक्योरिटीसाठी फोनमध्ये फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आलेला नाही. मात्र, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये सिंगल स्पीकर, हेडफोन जॅक, Wi-Fi आणि ब्लूटूथ वर्जन 5.2चा सपोर्ट आहे.