Nokia C12 लेटेस्ट स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. 6 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळत आहेत. जर तुम्हाला तुमच्या आज्जी-आजोबांना किंवा पालकांना हा फोन भेट द्यायचा असेल, तर Nokia C12 Amazon वर अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे. यावर अनेक ऑफर्सदेखील उपलब्ध आहेत, बघुयात सविस्तर-
हे सुद्धा वाचा : VI चा 299 रुपयांचा जबरदस्त प्लॅन! डेली डेटा, मनोरंजनासह मिळतील अनेक अप्रतिम बेनिफिट्स
या फोनची किंमत 7,499 रुपये आहे. मात्र, हा दोन 5,999 रुपयांना डिस्काउंटसह खरेदी करता येईन. ही त्याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आहे. जर तुम्हाला एकाच वेळी पैसे भरायचे नसतील तर तुम्ही EMI वरही फोन खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा केवळ 287 रुपये द्यावे लागतील. तसेच, नो कॉस्ट EMI वर फोन खरेदी करण्यासाठी, तुम्हाला दरमहा 1,000 रुपये द्यावे लागतील.
J&K बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर, 10 टक्के तात्काळ सूट दिली जाईल, जी कमाल 500 रुपये असेल. OneCard क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 7.5 टक्के झटपट सूट दिली जाईल, जी कमाल 1,000 रुपयांपर्यंत असेल. HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5 टक्के त्वरित सूट दिली जाईल, जी कमाल 250 रुपये असेल. येथून खरेदी करा
तुमच्याकडे जुना फोन असेल तर तुम्ही तो एक्सचेंज करू शकता. तुम्हाला एक्सचेंजवर 5,650 रुपयांपर्यंत सूट मिळेल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर, हा फोन फक्त 349 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. मात्र, यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान फोन उत्तम स्थितीमध्ये आणि लेटेस्ट मॉडेलचा असणे आवश्यक आहे.