HMD Global ने आपला नवीन फोन Nokia C12 भारतात लाँच केला आहे. Nokia C12 हा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे आणि नोकियाच्या C सीरीजचा नवीन सदस्य आहे. ज्यांना चांगला लुक हवा आहे आणि कमी किमतीत Android फोन स्टॉक करायचा आहे त्यांच्यासाठी Nokia C12 सादर करण्यात आला आहे. बघुयात फोनची किंमत आणि जबरदस्त फीचर्स…
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Moto G62 वर मोठ्या प्रमाणात मिळतेय सूट, पहा सर्वोत्तम ऑफर…
Nokia C12 ची विक्री भारतात सुरु झाली आहे. Nokia C12 च्या 2 GB RAM सह 64 GB स्टोरेजची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन डार्क शिऑन आणि लाइट मिंट कलरमध्ये खरेदी करता येईल. या किंमतीत हा फोन 17 मार्चपर्यंतच खरेदी करता येईल, म्हणजेच ही लॉन्चिंग किंमत आहे.
Nokia C12 मध्ये 6.3-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे आणि समोर वॉटरड्रॉप नॉच आहे ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा आहे. Nokia C12 मध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल रियर कॅमेरा सिस्टम मिळेल. फोनमध्ये नाईट मॉडेल आणि पोर्ट्रेट मोडसारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. Nokia C12 चा रियर सिंगल कॅमेरा आणि चंकी बिल्ड क्वालिटीसह बेसिक दिसतो. मागील पॅनेल प्लास्टिकचे बनलेले आहे.
हा फोन Android 12 (Go Edition) वर चालतो आणि पऍडव्हान्स ऑक्टा-कोर चिपसेटने सुसज्ज आहे. फोन 2 GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅमसह येतो. रिपोर्ट्सनुसार, नोकियाचा दावा आहे की ते वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या ऍप्समध्ये वेगाने नेव्हिगेट करण्यात मदत करेल. नवीनतम फोनमध्ये एक परफॉर्मन्स ऑप्टिमायझर देखील आहे, जो बॅकग्राउंडमध्ये विनाकारण चालणारे ऍप्स क्लीन करतो.