Nokiaने आपल्या बजेट सेगमेंटमध्ये येणाऱ्या C सीरीज अंतर्गत ग्राहकांसाठी नोकिया C12 हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा नवीनतम फोन कंपनीच्या Nokia C10 मोबाईल फोनची अपग्रेड आवृत्ती आहे. कंपनीने आपल्या नवीनतम फोनबद्दल वचन दिले आहे की, Nokia C12 ला प्रत्येक तिमाहीत 2 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स मिळत राहतील.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Oppo A78 वर सर्वात मोठी सूट, अप्रतिम ऑफरसह खरेदी करा फोन…
Nokiaच्या या मोबाईलची किंमत 119 युरो म्हणजेच अंदाजे 10,457 रुपये आहे. हे उपकरण चारकोल, डार्क ब्लु आणि लाईट मिंट रंगात खरेदी केले जाऊ शकते.
फोनमध्ये 6.3-इंच लांबीचा HD प्लस रिझोल्यूशन डिस्प्ले आहे, फोनच्या समोर तुम्हाला वॉटरड्रॉप नॉच दिसेल, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा स्थित आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये 1.6 GHz Unisock SC9863A ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 2 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रो SD कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते.
फोनमध्ये 3000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, एक धक्कादायक बाब म्हणजे आजकाल येणारे सर्व नवीन फोन न काढता येण्याजोग्या बॅटरीसह येतात, परंतु या डिव्हाइसची बॅटरी काढता येते. Nokia C12 मध्ये ब्लूटूथ वर्जन 5.2, 4G, मायक्रो USB पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, GPS सारखे फीचर्स पाहायला मिळतील.
Nokia C12 मध्ये तुम्हाला एक छोटा कॅमेरा मॉड्यूल पाहायला मिळेल, मागील बाजूस 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, तर 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उपलब्ध असेल.