Nokia A1 Plus स्मार्टफोन या फीचर्स सह IFA 2018 मध्ये केला जाऊ शकतो लॉन्च
Nokia A1 Plus स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 845, इन-डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर आणि LG च्या OLED डिस्प्ले सह IFA 2018 मध्ये लॉन्च केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Nokia A1 Plus Device to Come With Triple Camera Combo to Launch at IFA 2018: HMD ग्लोबल च्या पोर्टफोलियो वर नजर टाकल्यास कंपनी कडे सध्या सर्वात महाग फोन Nokia 8 Sirocco आहे. पण आता असे वाटते आहे की कंपनी लवकरच एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, जो कंपनी चा पुढील फ्लॅगशिप डिवाइस असेल. एका रिपोर्ट वर विश्वास ठेवल्यास हा डिवाइस कंपनी कडून प्रीमियम सेगमेंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, तसेच याला Nokia A1 Plus नाव देण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत, असे पण बोलले जात आहे की हा डिवाइस कंपनी कडून IFA 2018 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
WinFuture चा एक रिपोर्ट पाहिल्यास असे समोर येत आहे की हा डिवाइस प्रीमियम लेवल डिवाइस प्रमाणे लॉन्च केला जाणार आहे. तसेच यात एक LG द्वारा निर्मित OLED डिस्प्ले त्याचबरोबर क्वालकॉम चा लेटेस्ट प्रोसेसर म्हणजे स्नॅपड्रॅगन 845 असेल. असे पण बोलले जात आहे की हा डिवाइस गूगल च्या लेटेस्ट OS एंड्राइड P सह लॉन्च केला जाऊ शकतो. पण या डिवाइस मध्ये जो सर्वात खास फीचर मिळू शकतो, तो म्हणजे यातील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर. हा डिवाइस पाहिल्यास हा Vivo च्या Vivo X21 स्मार्टफोन ला चांगली टक्कर देण्यास सक्षम असेल.
HMD ग्लोबल या कामासाठी Foxconn सोबत मिळून काम करत आहे आणि असे बोलले जात आहे की हा डिवाइस कंपनी कडून ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. ही वेळ IFA ची असते, हा इवेंट बर्लिन मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. असेही बोलले जात आहे की कंपनी आपला हा डिवाइस याच इवेंट मध्ये सादर करू शकते.
असे पण बोलले जात आहे की हा डिवाइस Nokia 9 म्हणून पण लॉन्च केला जाऊ शकतो, या डिवाइस बद्दल आता पर्यंत अनेक बातम्या आणि माहिती आली आहे. तसे पाहता हा डिवाइस या चालू काळात लॉन्च केला जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या, पण अधिकृत पणे याबद्दल अजूनतरी काही माहिती समोर आली नाही.
Nokia 9 स्मार्टफोन बद्दल आता पर्यंत आलेल्या लीक इत्यादी वर विश्वास ठेवल्यास असे बोलता येईल हा डिवाइस कंपनी कडून एका 6.01-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो, तसेच यात तुम्हाला गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन पण मिळणार आहे. या डिवाइस मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 मिळेल, तसेच यात तुम्हाला 8GB चा रॅम पण मिळणार आहे. स्मार्टफोन मध्ये एक ट्रिपल कॅमेरा मिळू शकतो, हा एक 41-मेगापिक्सल, 20-मेगापिक्सल आणि 9.7-मेगापिक्सल च्या कॅमेरा कॉम्बो सह येऊ शकतो.