HMD ग्लोबल Nokia 8 प्रो ला ऑगस्ट मध्ये लॉन्च करू शकते. त्यानंतर सप्टेंबर मध्ये Nokia 9 सादर होऊ शकतो.
HMD ग्लोबल ने कही दिवसांपूर्वी आयोजित MWC 2018 मध्ये आपले 5 फोंस सादर केले होते. यात एक फीचर फोन आणि 4 स्मार्टफोंस चा सामवेश आहे आता एका ताजा रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की, कंपनी यावर्षी Nokia 9 आणि Nokia 8 Pro ला सादर करेल, ज्यात स्नॅपड्रॅगन 845 सह येतील. Nokia Power User च्या रिपोर्ट मध्ये माहिती देण्यात आली आहे की, Nokia 8 Pro आणि Nokia 9 स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर सह येईल आणि हे ऑगस्ट आणि सप्टेंबर च्या दरम्यान सादर केले जाऊ शकतात. अंदाज लावला जात आहे की, Nokia 8 Pro ऑगस्ट मध्ये सादर होऊ शकतो, तर Nokia 9 सप्टेंबर मध्ये सादर केला जाऊ शकतो. Nokia 9 च्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर याची किंमत Samsung Galaxy S9+ इतकी असू शकते. या फोन मध्ये 5.7-इंचाचा डिस्प्ले असू शकतो, 18:9 आस्पेक्ट रेशियो सह येऊ शकतो. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण असू शकतो. आधी समोर आलेल्या माहिती नुसार, Nokia 8 प्रो मध्ये मागच्या बाजूस 5 कॅमेरे असू शकतात. हे कॅमेरे गोल आकारात प्लेस केले जातील. जसा Lumia 1020 मध्ये देण्यात आला होता.