Nokia 8 साठी पुन्हा येईल अँड्रॉइड 9 पाई अपडेट
पुन्हा एकदा Nokia 8 साठी अँड्रॉइड 9 पाई अपडेट दिला जात आहे.
अलीकडेच Nokia 8 साठी लेटेस्ट अँड्रॉइड 9 पाई अपडेट देण्यास उशीर करण्यात आला होता. HMD ग्लोबल चे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर Juho Sarvikas यांनी सांगितले होते कि “भारतात VoLTE सोबत काही समस्या असल्यामुळे अपडेट पुढे ढकलला जात आहे. कंपनी नवीन सॉफ्टवेयर वर्जन वर काम करत आहे.” आता असे वाटत आहे कि Nokia 8 साठी कंपनी नवीन अँड्रॉइड 9 पाई अपडेट आणत आहे.
लेटेस्ट अपडेट V5.110 वर्जन मध्ये येत्तो जो सुधारित सिस्टम स्टेबिलिटी आणि सिक्योरिटी पॅच डिसेंबर 2018 ऑफर करतो आणि यासोबत अँड्रॉइड 9 पाई चा समावेश आहे. Nokia 5.1 Plus आणि Nokia 8 Sirocco ला आधीच अँड्रॉइड पाई चा अपडेट मिळाला आहे आणि आशा आहे लवकरच Nokia 3.1 Plus, Nokia 5, आणि Nokia 6 ला नवीन अपडेट दिला जाईल.
या डिवाइस मध्ये 5.3 इंचाची QHD स्क्रीन आहे, जी गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन सह येते. चांगल्या परफॉर्मन्स साठी कंपनी ने Nokia 8 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 835 प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज ने सुसज्ज आहे आणि याची स्टोरेज माइक्रो SD कार्ड द्वारा 128GB पर्यंत वाढवता येते. Nokia 8 च्या मागील बाजूस 13MP चा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि सेल्फी साठी 13MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरे ZEISS ऑप्टिक्स सह येतात.