Nokia 8 ला एंड्राइड Pie सोबत मिळेल नवीन कॅमेरा एक्सपीरियंस, फेस अनलॉक वर चालू आहे काम
Nokia 8 वापरणाऱ्या किंवा विकत घेण्याचा विचार करणार्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. Nokia 8 ला एंड्राइड पाई च्या सपोर्ट सह एक नवीन कॅमेरा एक्सपीरियंस पण आता मिळणार आहे.
Nokia 8 वापरणाऱ्या किंवा विकत घेण्याचा विचार करणार्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. Nokia 8 ला एंड्राइड पाई च्या सपोर्ट सह एक नवीन कॅमेरा एक्सपीरियंस पण आता मिळणार आहे. ही माहिती कंपनीने नुकत्याच दिलेल्या एका अपडेट नंतर मिळालेल्या काही इशू नंतर समोर आली आहे.
पण आता कंपनी चे CPU Juho Sarvikas ने आपल्या ट्विटर वरून ही सूचना दिली आहे की लवकरच Nokia 8 च्या यूजर्सना नवीन अपडेट मिळणार आहे. याचा अर्थ असा की Nokia 8 ला लवकरच एंड्राइड Pie चा सपोर्ट मिळणार आहे, तसेच या यूजर्सना एक नवीन कॅमेरा एक्सपीरियंस पण मिळेल.
Hey let's not get carried away here. We already issued a camera update and you will shortly get another one with Pie with new experiences. Also ARcore support is there, 8., Etc… Facial unlock we haven't rolled out yet to our products as we are still evaluating solutions.
— Juho Sarvikas (@sarvikas) August 31, 2018
त्याचबरोबर जर फेस अनलॉक फीचर बद्दल बोलायचे झाले तर कंपनी यावर काम करत आहे, आणि लवकरच यूजर्सना हा मिळणार आहे. Sarvikas ने पण याबद्दल सांगितले आहे की यावर आता काम चालू आहे. काही दिवसांपूर्वी समोर आले होते की Nokia 9 मध्ये पण कंपनी फेस अनलॉक फीचर देणार आहे.