Nokia 8.1 स्नॅपड्रॅगॉन 710 SoC सह लॉन्च, बघा किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
चीन मध्ये Nokia X7 नावाने लॉन्च झालेला डिवाइस ग्लोबली Nokia 8.1 स्मार्टफोन नावाने सादर केला जात आहे. आशा आहे की 10 डिसेंबरला हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाईल.
HMD ग्लोबल ने दुबई मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये बुधवारी आपला Nokia 8.1 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च झालेल्या Nokia X7 डिवाइसचा ग्लोबल वेरिएंट आहे. या डिवाइस मध्ये नोकिया 5.1 प्लस आणि नोकिया 6.1 प्लस प्रमाणेच ग्लास डिजाइन आणि नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे.
Nokia 8.1 ची किंमत EUR 399 (जवळपास Rs 31,900) ठेवण्यात आली आहे. हा डिवाइस गूगलच्या एंड्राइड एंटरप्राइस प्रोग्राम सह लॉन्च करण्यात आला आहे. UAE मध्ये डिवाइस 1,499 दिरहम मध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि याचा सेल मिडिल-ईस्ट मध्ये 10 डिसेंबर पासून सुरु होईल आणि रिटेल मध्ये 15 डिसेंबर पासून हा डिवाइस उपलब्ध होईल. हा फोन उद्या पासून प्री-बुकिंग साठी उपलब्ध होईल. कंपनी हा डिवाइस 10 डिसेंबरला नवी दिल्लीत आयोजित इवेंट मध्ये भारतात लॉन्च करू शकते.
स्पेसिफिकेशंस बद्दल बोलायचे तर Nokia 8.1 एक एंड्राइड वन स्मार्टफोन आहे आणि त्यामुळेच हा लेटेस्ट एंड्राइड 9 पाई वर चालतो. डिवाइस मध्ये 6.18 इंचाचा प्यूरडिस्प्ले IPS LED पॅनल देण्यात आला आहे जो 2246×1080 पिक्सलचे फुल HD+ रेजोल्यूशन ऑफर करतो आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 18.7:9 आहे.
हा डिवाइस क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 710 SoC आणि एड्रेनो 616 GPU द्वारा संचालित आहे आणि हा 4GB आणि 6GB रॅम तसेच 64GB आणि 128GB स्टोरेज ऑप्शन्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर स्मार्टफोनच्या बॅकला 12 आणि 13 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात सेकेंडरी सेन्सर टेलीफोटो लेंस असून तो झूम आणि पोर्ट्रेट मोड साठी उपयोगी पडतो. डिवाइसच्या फ्रंटला सेल्फी आणि विडियो कॉलिंग साठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
कनेक्टिविटी साठी Nokia 8.1 मध्ये डुअल-सिम कार्ड स्लॉट्स, ब्लूटूथ, 4G LTE, VoLTE, USB टाइप-C पोर्ट देण्यात आले आहेत. डिवाइस मध्ये 3,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंग फीचर सह येते.